ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

By admin | Published: July 3, 2014 09:53 PM2014-07-03T21:53:18+5:302014-07-04T00:16:37+5:30

ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

Bring the thoughts of Dnyaneshwari into consideration | ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणावेत

Next

 

सिन्नर : आयुष्यातील पन्नास वर्षे ज्ञानेश्वरीचे पारायण केलेल्या भक्तास थोड्या थोड्या गोष्टींचा राग येत असेल तर केलेल्या पारायणाची किंमत शून्य होते. ज्ञानेश्वरीतील विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य महाराज यांनी केले.
माळेगाव येथील एका कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभासाठी ते सिन्नर येथे आले होते. त्यावेळी भक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शंकराचार्य यांच्या सिन्नरभेटीची माहिती समजताच भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
या प्रसंगी शंकराचार्य यांनी ज्ञानेश्वरीतील पसायदानावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी पसायदानात निवृत्तिनाथांकडे पुष्पक मागण्या केल्या आहेत. परंतु संत निवृत्तिनाथांनी एवढेच सांगितले आहे की, ज्ञानेश्वरी ग्रंथात जे विचार उपदेशिले आहेत. ते जो भक्त आचारणात आणील त्याला आशीर्वाद दिले आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपदा वेदानेही आचरणाला महत्त्व दिले आहे.
दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्याने त्यांनी प्रवचन आवरते घेतले. यापूर्वी एक महिन्यांपूर्वीही त्यांनी सिन्नर येथील भैरवनाथ मंदिरात धावती भेट दिली. त्यावेळीही ते घाईगर्दीत असल्याने त्वरित निघून गेले. त्यावेळीही भक्तांचा त्यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळेसही भाविकांना अशीच निराशा झाली. (वार्ताहर)
मालेगावी
शिवसेनेची बैठक
मालेगाव : शिवसेनेच्या माझा महाराष्ट्र - भगवा महाराष्ट्र अभियानाअंतर्गत येथे स्थानिक शिवसैनिकांची बैठक झाली. त्यात आमदार दादा भुुसे, बंडूकाका बच्छाव, संजय दुसाने, कैलास तिसगे, नथू देसले आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी शहर - तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bring the thoughts of Dnyaneshwari into consideration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.