ब्रिटिशकालीन पूल बनले धोकेदायक
By admin | Published: August 7, 2016 01:55 AM2016-08-07T01:55:03+5:302016-08-07T01:55:18+5:30
ब्रिटिशकालीन पूल बनले धोकेदायक
उपनगर : शहरातील ब्रिटिशकालीन पूल मुसळधार पावसामुळे धोकेदायक बनले असून, त्यांचे सर्वेक्षण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विभागीय महसूल आयुक्त डॉ. संजय कोलते यांना राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाड येथे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून मोठी जीवितहानी होऊन दुर्घटना झाली आहे. नाशिक शहरातदेखील तीन ब्रिटिशकालीन पूल बंद आहेत. त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यात यावी, धोका असल्यास सदरील पूल वाहतुकीसाठी बंद करून त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शिवराज ओबेरॉय, सौरभ मोहाटे, अमोल लोखंडे आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)