ब्रिटिशकालीन ‘डकोटा’चे ओझर विमानतळावर आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:41 AM2019-02-09T00:41:02+5:302019-02-09T00:41:26+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी छोटेखानी समारंभात त्याचे स्वागत करण्यात आले.

British Dakota arrival at Ozar airport | ब्रिटिशकालीन ‘डकोटा’चे ओझर विमानतळावर आगमन

ब्रिटिशकालीन ‘डकोटा’चे ओझर विमानतळावर आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देवायुसेनेकडून स्वागत : एअर शोसाठी आज झेपावणार बंगळुरुला

ओझर : स्वातंत्र्यपूर्व काळात भारत-पाक युद्धात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या भारतीय वायुसेनेच्या ‘डकोटा डी-सी ३’ या लढाऊ विमानाचे तब्बल सात दशकानंतर गाझियाबादहून भरारी घेत नाशिकच्या ओझर विमानतळ येथे शुक्र वारी (दि.८) दुपारी साडेतीन वाजता आगमन झाले. यावेळी छोटेखानी समारंभात त्याचे स्वागत करण्यात आले. एक दिवस मुक्कामी राहून शनिवारी (दि.९) ते बंगळुरूकडे झेप घेईल व तेथे दि. २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एअर शोमध्ये विविध कवायती सादर करेल.
डकोटाचे दि. ५ फेब्रुवारीलाच ओझरला आगमन होणार होते परंतु बंगळुरूत ज्या ठिकाणी सदर विमान उतरणार होते तेथे मिराज-२००० हे लढाऊ विमान कोसळल्याने रणवे बंद होते. त्यामुळे शुक्रवारी (दि.८) ते ओझर येथे दाखल झाले. डकोटाचा आगमन सोहळा भारतीय वायुसेनेच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भारतीय वायुसेनेचा अमूल्य ठेवा म्हणूनदेखील डकोटाला संबोधले गेल्याने नाशिकच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण होता.
१९४० च्या सुमारास डकोटा लढाऊ विमान हे इंग्लंडमध्ये बनवले गेले. आठ दशकांपूर्वी याला बनवायला जवळपास सहाशे हजार युरो इतका खर्च आला होता. त्याकाळी तेथील सरकारने भारतातल्या काही पायलटांना प्रशिक्षण दिले. याची विशेष कामगिरी म्हणजे १९४७ या युद्धात पहिल्या शीख रेजिमेंटची वाहतूक याच विमानाने केली गेली होती. त्यानंतर शस्त्रांची व जवानांची ने-आण करण्यास डकोटाने महत्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिशकालीन असलेल्या डकोटचे अनेक वर्षांपासून वापर करणे बंद झाले होते. डकोटा ही ब्रिटिशांची देण असली तरी सद्यस्थितीत त्याचे उड्डाण होण्यासाठी त्यात केलेले आमूलाग्र बदल हे भारतात केले आहे.
तिसरा मान महाराष्टÑाला
१९७० नंतर डकोटाचा वापर जवळपास बंदच झाला होता. मात्र, त्यात अंतर्गत बदल केल्यानंतर त्याचे पहिल्या सराव उड्डाणाचा मान गुजरातमधील जामनगर धावपट्टीला मिळाला. त्यानंतर दुसरे सराव उड्डाण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद धावपट्टीवर झाले तर तिसरा मान ओझर विमानतळाच्या रुपाने महाराष्टÑाला प्राप्त झाला आहे. ही महाराष्टÑाप्रमाणेच नाशिकच्या दृष्टीनेही आनंदाची बाब मानली जात आहे.

Web Title: British Dakota arrival at Ozar airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.