ब्रिटिशकालीन रोकडे वाड्याला मिळाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:46+5:302021-07-08T04:11:46+5:30
नांदूरवैद्य (किसन काजळे) : सुपरस्टार दिलीपकुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सुपरहिट ‘गंगा जमुना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या नांदूरवैद्य येथील ब्रिटिशकालीन ...
नांदूरवैद्य (किसन काजळे) : सुपरस्टार दिलीपकुमार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सुपरहिट ‘गंगा जमुना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झालेल्या नांदूरवैद्य येथील ब्रिटिशकालीन रोकडे वाड्याला उजाळा मिळाला आहे. या वाड्याचे मालक राजाभाऊ रोकडे यांच्यासह त्या काळातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांनी दिलीपकुमार यांच्या
आठवणी जतन केल्याचे दिसून आले.
नांदूरवैद्य येथे सन १९६१-६२ सालात अभिनेते दिलीपकुमार व वैजयंती माला यांच्या सुपरहीट ठरलेल्या ‘गंगा-जमुना’ या चिञपटाचे संपूर्ण चित्रीकरण येथील रोकडे वाड्यात, तसेच भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी जवळपास तीन वर्षे चालले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या कानावर दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी येताच हळहळ व्यक्त करण्यात आली. गावातील इंग्रजकालीन रोकडे वाडा व ‘गंगा-जमुना’ चित्रपटातील चित्रीकरणामुळे नांदूरवैद्य गावची एक ओळख निर्माण झाली. यावेळी चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर दिलीपकुमार यांनी आपली आठवण म्हणून नांदूरवैद्य येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व श्रीकृष्ण मंदिर अशा दोन भव्य मंदिरांचे बांधकाम करून दिले. काही दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांच्या नातेवाइकांनी नांदूरवैद्य येथील रोकडे वाड्याला भेट दिली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना नांदूरवैद्यला इच्छा असतानाही येता आले नाही. यावेळी सर्व नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या वतीने दिलीपकुमार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-----------------
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मन सुन्न झाले. आम्ही राहत असलेल्या ब्रिटिशकालीन रोकडे वाड्यात दिलीपकुमार यांच्या ‘गंगा-जमुना’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. त्यानंतर आम्ही त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन केले आहे. महाराष्ट्रातून अनेक पर्यटक या ऐतिहासिक वाड्याला वर्षभर भेट देतात. या वाड्यातील त्यांच्या वस्तूंचे आमच्या कुटुंबाकडून जतन होत राहील.
राजाभाऊ रोकडे, रोकडे वाड्याचे मालक
-----------------
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील सलग तीन वर्षे दिलीपकुमार यांच्या ‘गंगा-जमुना’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेला हाच तो ब्रिटिशकालीन रोकडे वाडा. (०७ नांदूरवैद्य २)
070721\07nsk_5_07072021_13.jpg
०७ नांदूरवैद्य २