कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याला कालवा पाण्यासाठी थेट विमोचक मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:44 PM2019-07-13T19:44:39+5:302019-07-13T19:46:51+5:30
अंदरसुल : पालखेड धरण समुहातील पालखेड डावा कालवा अंदरसुल (ता. येवला) येथील कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन घोडके वस्ती बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक (आऊटलेट) मंजूर झाला आहे.
अंदरसुल : पालखेड धरण समुहातील पालखेड डावा कालवा अंदरसुल (ता. येवला) येथील कोळगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन घोडके वस्ती बंधारा भरण्यासाठी थेट विमोचक (आऊटलेट) मंजूर झाला आहे.
सदर बंधाºयावरील लाभधारक शेतकरी व शेतमजूर यांनी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच प्रा विनिता सोनवणे उपसरपंच वैशाली जानराव आणि सदस्यांनी आमदार छगन भुजबळ यांच्याकडे सदरचे विमोचक मंजूर करण्यात येण्यासाठी वेळोवेळी मागणी केली होती.
सदरचे विमोचक बांधून झाल्यावर परिसरातील नागरिकांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पालखेड धरण समुहातील धरण परिसरात जास्त पाऊस झाल्यानंतर खरिप हंगामात पालखेड डाव्या कालव्यातुन पुर पाणी सोडले जात असत. या पाण्यातुन पालखेड डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील नदी-नाल्यावर असलेले बंधारे भरु न देण्यात येत असतात.
परंतु अंदरसुल येथील कोळगंगा नदीवरील घोडके वस्ती ब्रिटिश कालीन बंधारा भरण्यासाठी विमोचक नसल्याने अडचण येत होती. त्यामुळे सदर परिसरातील जनतेला पाणी कमी मिळत असे, म्हणून सदर ठिकाणी विमोचक होणे अत्यंत आवश्यक होते.
सदर विमोचक मंजुर होऊन लवकर काम सुरू केल्यास परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सदर प्रसंगी विजय जाधव, सुमीत एंडाईत, तुषार एंडाईत, सागर एंडाईत, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.