पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:13 AM2020-02-27T00:13:55+5:302020-02-27T00:16:18+5:30

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा लागत आहे.

Broken contact of two states due to lack of bridges | पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क

पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क

Next
ठळक मुद्देपेठ तालुक्यातील नागरिकांची कसरत : ५० मीटरसाठी ४० किलोमीटरचा फेरा

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा लागत आहे.
पेठपासून १५ किमी अंतरावर बेजावड नदीवर वसलेले गायधोंड हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव. नदीपात्र हेच काय ते महाराष्ट्र व गुजरात राज्याची सीमा दर्शके. नदीच्या इकडच्या तीरावर महाराष्ट्र तर पलीकडच्या तीरावर गुजरात
राज्य. त्यामुळे गायधोंडसह
आडगाव, बिलकस, उंबरपाडा, बेलपाडा, गारमाळ, रानविहीर,
अंधृटे आदी गावांचा महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्यातील वीरक्षेत, सुतारपाडा, खांबविहीर, वड्याचा पाडा या गावांशी अंतराच्या व व्यापारी दृष्टीने अतिशय जवळचे संबंध.
शेतात पिकविलेला माल गावातून पेठ व पेठहून गुजरातला पाठविण्यासाठी जवळपास ४० किमी वाढीव अंतर कापावे लागत असल्याने गायधोंड वड्याचा पाडा या दोन गावांना जोडणारा पूल तयार झाल्यास दहा-बारा गावांना दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. गुजरातमध्ये सुतार पाडा ही मोठी बाजारपेठ असून, सीमारेषेवरील नागरिक पेठऐवजी सुतारपाडा येथे खरेदीसाठी पसंती देतात, मात्र पावसाळ्यात नदीला पूर व इतर वेळी दगड पाणी नदीपात्रात साचत असल्याने या अवघड परिस्थितीतून वाहने मार्गक्र मण करणे जिकिरीचे होऊन बसते. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत असल्याने माणसं व जनावरांना धोका निर्माण होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. तरी या नदीवर पुलाचे बांधकाम होणे आवश्यक असल्याने ग्रामस्थांनी कळविले आहे.गायधोंडपासून नदीपात्रातून पलीकडच्या गावांना प्रवास करताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. शेतकºयांनी पिकविलेले धान्य व भाजीपाला डोक्यावर घेऊन वाहतूक करावी लागत असल्याने या नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास स्थानिक नागरिकांची अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकेल.
- नेताजी गावित, ग्रामस्थ, आडगाव, ता. पेठ

Web Title: Broken contact of two states due to lack of bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.