जिल्ह्याला क्षयरोग उच्चाटनामुळे ब्राँझ पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:08 PM2021-03-24T23:08:18+5:302021-03-25T00:54:54+5:30

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.

Bronze medal for tuberculosis eradication to the district | जिल्ह्याला क्षयरोग उच्चाटनामुळे ब्राँझ पदक

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याला उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते ब्राँझ पदक स्वीकारताना नाशिकचे डॉ. एम बी. देशमुख, डॉ. योगेश चित्ते.

Next
ठळक मुद्देनाशिक आरोग्य शिरपेचात मानाचा तुरा : दिल्ली येथे सोहळा संपन्न

नाशिक : जगात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून भारताचा क्रमांक अव्वल आहे. जगाच्या तुलनेत २४ टक्के भारतात असून महाराष्ट्रात १० टक्के अशी आकडेवारी तज्ञांच्या वतीने वर्तविले जाते. तरी सुद्धा नाशिक आरोग्य विभागाने क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कंबर कसली असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला चांगल्या कार्याबद्दल ब्राँझ पदक प्रदान करण्यात आले असून ही नाशिक जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब आहे.

दिल्ली येथे क्षयरोग दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.२४) केंद्रीय आरोग्यमंत्रीडॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख व डॉ. योगेश चित्ते यांना ब्राँझ पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र आरोग्य विभाग क्षयरोग निर्मूलनाचे कार्य मोठ्या प्रमाणात करत असून नाशिक जिल्ह्यातील क्षयरोग निर्मूलनाचे कार्य उल्लेखनीय आहे. नाशिक जिल्हा क्षयरोग निर्मूलनाच्या उंबरठ्यावर असल्याने त्यांच्याच कार्याची पावती म्हणून नाशिक जिल्ह्याला ब्राँझपदक प्राप्त झाले आहे.

भारतातून ६२८ जिल्ह्यामधून ७० जिल्हे
नामांकनासाठी पात्र झाले होते. त्यातील २९ जिल्ह्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या जिल्ह्यामधून
जागतिक आरोग्य यंत्रनेच्या टीमने नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १० हजार घरांघरांत जाऊन तब्बल ४१ हजार लोकांचे आरोग्य तपासणी करून यांच्या कार्याची पावती केंद्रीय आरोग्य विभागाकडे आपला प्रस्ताव सादर करण्यात येत असतो. याबरोबरच ५ वर्षांच्या कार्याची दखल यामधून घेतल्या जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील आरोग्य क्षयरोग विभागाने मोठी मजल मारली असून २०२५ पर्यंत जिल्ह्यातून क्षयरोग समूळ नष्ट होईल हे नक्की.

या कार्याला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रत्ना रावखंडे, क्षयरोग अधिकारी डॉ एम बी देशमुख, जिल्हा क्षयरोग केंद्राचे प्रमुख डॉ योगेश चित्ते यांचा सहभाग आहे.

 

 

Web Title: Bronze medal for tuberculosis eradication to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.