ग्रामीण रस्त्यांवर फिरला श्रमदानाचा झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:37+5:302021-09-17T04:19:37+5:30
स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त ...
स्वातंत्र्य दिनाचे अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. १६) महा श्रमदान मोहिमेमध्ये गावांमधील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. तसेच प्लास्टिकबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेमध्ये गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी (नाशिक), लता गायकवाड (इगतपुरी), चंद्रकांत भावसार (दिंडोरी), पांडुरंग कोल्हे (बागलाण), किरण जाधव (त्रंबकेश्वर), राजेश देशमुख (देवळा), उमेश देशमुख (येवला), मधुकर मुरकुटे (सिन्नर), आदींनी सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान केले.
(फोटो १६ झेडपी)