भाऊ, पित्याकडून मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:52 AM2018-10-12T01:52:10+5:302018-10-12T01:53:29+5:30
शेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे.
मालेगाव : शेतजमीन व विहिरीच्या वादातून तरुणाचा सख्खा भाऊ व वडिलांनी कुºहाडीने वार करून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील लुल्ले येथे घडला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव सावकार तानाजी माळी असे आहे. शेती व विहिरीच्या वादावरून वडील तानाजी माळी व भाऊ सोनू माळी यांनी कुºहाडीने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत सावकार याचा मृत्यू झाला. तसेच त्याची पत्नी अलकाबाई व
बहीण ताराबाई सोनवणे यांनाही संशयितांनी मारहाण केली.
तानाजी माळी व सोनू माळी या पिता-पुत्रांना रामदास गांगुर्डे, कैलास सोनवणे या दोघांनी चिथावणी देत सावकार नेहमी तुम्हाला त्रास देईल, याला जिवंत ठेवू नका अशी फूस लावल्याचे अलकाबाई माळी यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास राऊत हे करीत आहेत.