किरकोळ वादातून नाशिकरोडला भाजीविक्रेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:38 AM2018-10-23T01:38:23+5:302018-10-23T01:38:41+5:30

उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात दुचाकी बाजूला केल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून नरसिंग शिंदे या भाजीविक्रेत्याची हत्या झाल्याची घटना अरिंगळेमळा येथे घडली. पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मयत शिंदे यांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 The brother-in-law of Nashik Road from the retail dispute | किरकोळ वादातून नाशिकरोडला भाजीविक्रेत्याचा खून

किरकोळ वादातून नाशिकरोडला भाजीविक्रेत्याचा खून

Next

नाशिकरोड : उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात दुचाकी बाजूला केल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून नरसिंग शिंदे या भाजीविक्रेत्याची हत्या झाल्याची घटना अरिंगळेमळा येथे घडली. पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मयत शिंदे यांचा मुलगादेखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकलहरारोड अरिंगळे मळ्यातील श्रीकृष्णनगर येथे राहणारे नरसिंग गोपीनाथ शिंदे (४२) नाशिकरोड उड्डाणपुलाखालील भाजीबाजारात उसळ विक्रीचा व्यवसाय करत होते. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास नरसिंग यांचा मुलगा मारुती हा वडिलांना उसळ विक्री करण्यास मदत करण्यासाठी उड्डाण पुलाखाली कार घेऊन भाजीबाजारात गेला होता. मात्र त्यांच्या दुकानाजवळील मोकळ्या जागेत दुचाकी उभी असल्याने मारुती याने सदर दुचाकी बाजूला केली. यावरून दुचाकीमालक दीपक शंकर पाडळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, सामनगावरोड) याला राग आल्याने त्याने मारुती याच्याबरोबर वाद घातला. यातून नरसिंग व दीपक यांच्यात झटापटी झाली मात्र अन्य विक्रेत्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला होता.  त्यानंतर नरसिंग आणि त्यांचा मुलगा मारुती हे आपल्या घरी गेले. नरसिंग यांचा मुलगा संदीप यास घरी येण्यास उशीर झाल्याने त्याला बघण्यासाठी नरसिंग घराबाहेर पडले असता संशयित दीपक शंकर पाडळे, सुरेश उर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे, आकाश शंकर पाडळे, अमोल  शंकर पाडळे व एक अल्पवयीन  मुलगा या पाच जणांनी नरसिंग तसेच त्यांचा मुलगा संदीप यांना लाथाबुक्क्यांनी व दांड्याने  बेदम मारहाण केली. सुरेश ऊर्फ  पिंटू सोनवणे याने नरसिंग याच्यावर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी नरसिंग यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 
पाच दिवस पोलीस कोठडी
या हल्ल्यात जखमी झालेला संदीप नरसिंग शिंदे व संशयित हल्लेखोर अमोल शंकर पाडळे हादेखील जखमी झाल्याने दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title:  The brother-in-law of Nashik Road from the retail dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.