भाऊ-बहिणीचे नाते झाले दृढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:57 AM2017-08-08T00:57:01+5:302017-08-08T00:58:32+5:30
नाशिक : भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीमधील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त सोमवारी (दि.७) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीमधील प्रेम, बंधुभाव अन् विश्वासाच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बहीण आपल्या भावाचे सकाळी औंक्षण करत मनगटावर राखी बांधते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला संकटसमयी रक्षण करण्याची अप्रत्यक्षपणे ग्वाही देतो.
नाशिक : भाऊ-बहिणीचे बंधुप्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. हिंदू संस्कृतीमधील अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेल्या या सणानिमित्त सोमवारी (दि.७) शहरात घरोघरी बहिणीने भाऊरायाचे औंक्षण करीत राखी बांधली.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीमधील प्रेम, बंधुभाव अन् विश्वासाच्या नात्याची वीण अधिकाधिक घट्ट करणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त बहीण आपल्या भावाचे सकाळी औंक्षण करत मनगटावर राखी बांधते. यावेळी भाऊ आपल्या बहिणीला संकटसमयी रक्षण करण्याची अप्रत्यक्षपणे ग्वाही देतो. शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून बाजारपेठेत राख्यांनी विविध दुकाने सजली होती. राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची दुकानांवर गर्दी दिसून येत होती. बाजारपेठेत गर्दी रक्षाबंधन सणासाठी देण्यात येणाºया भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. विशेषत: सायंकाळच्या सुमारास बाजारपेठ गजबजली होती. कापड दुकान तसेच भेटवस्तूच्या दुकानातून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.