स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

By संजय पाठक | Published: August 15, 2023 06:56 PM2023-08-15T18:56:33+5:302023-08-15T18:57:38+5:30

गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होण्यापूर्वीचा प्रकार

Brother-sister suicide attempt on Independence Day in Nashik; Police Detained them | स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

स्वातंत्र्यदिनी बहिण-भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने अनर्थ टळला

googlenewsNext

नाशिक - भूमिअभिलेखच्या कारभाराच्या निषेधार्थ नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करणाऱ्या बहीण भावाने आज स्वातंत्र्य दिनी आत्महदहनाची तयारी केली होती. मात्र, पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. आज सकाळी नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालय येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार होते. त्यापूर्वी हा प्रकार घडला.

वडिलोपार्जित क्षेत्र गमविल्यामुळे चांदवड तालुक्यातील शिंगवे मातोबाचे गावातील योगेश खताळ व त्यांची बहीण अश्विनी खताळ यांचे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून  उपोषण सुरू आहे.भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे आपले वडिलोपार्जित क्षेत्र गमावण्याची वेळ आल्याचे  योगेश खताळ यांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात निवेदने देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले आहे. मात्र, आज सकाळी योगेश खताळ हे पेट्रोलच्या साह्याने आत्मदहनाचा प्रयत्न करणार असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि दोघा बहिण-भावाला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Brother-sister suicide attempt on Independence Day in Nashik; Police Detained them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.