इच्छुकांची भाऊगर्दी, त्यात आजी-माजी आमदारांची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:47+5:302021-09-16T04:19:47+5:30

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस असून यंदा काँग्रेस मनसेला उमेदवार शोधावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत प्रभागात रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, प्रियंका ...

Brotherhood of aspirants, including the battle of grandparents and former MLAs | इच्छुकांची भाऊगर्दी, त्यात आजी-माजी आमदारांची लढाई

इच्छुकांची भाऊगर्दी, त्यात आजी-माजी आमदारांची लढाई

Next

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस असून यंदा काँग्रेस मनसेला उमेदवार शोधावा लागणार आहे.

गेल्या निवडणुकीत प्रभागात रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, प्रियंका माने हे तिघे भाजपचे तर पूनम मोगरे या शिवसेकडून निवडून आल्या होत्या. गेल्यावेळी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने काही नाराजांनी मनसे व सेनेकडून निवडणूक लढविली होती. काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नसल्याने यंदा काँग्रेसला उमेदवार शोधावा लागेल. शिवसेना-भाजप युती झाल्यास दोन्ही पक्षाचे एक एक उमेदवार राहतील. महाविकास आघाडी झाल्यास सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा जाईल. भाजप व मनसे स्वतंत्र लढले तर भाजप मनसेला महाविकास आघाडीशी मुकाबला करावा लागेल.

गतवेळी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छींद्र यांच्या उमेदवारीवरून विरोध झाला. काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षाकडून निवडणूक लढविली होती. मात्र, आता सानप यांच्याकडे बऱ्यापैकी सूत्रे असल्याने किमान या प्रभागात तरी सानप ठरवतील तो उमेदवार असे सांगितले जात आहे. मात्र, आमदार ॲड. राहुल ढिकले असल्याने पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरेल मात्र प्रभागात निवडणूक सोपी घेऊन चालणार नाही कारण यंदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यात भाजपमधील अंतर्गत वादामुळे ऐनवेळी दगाफटका बसण्याची शक्यता आहे.

ईन्फो बॉक्स

नवीन कामे नाहीत

प्रभागातील चारही नगरसेवकांची तोंडे चार दिशेला आहेत. त्यांचे नवीन वसाहतीत लक्ष नाही, प्रभागात ठोस कामे नाही, पाणी, स्वच्छता, रस्ते हे नागरिकांशी मूलभूत प्रश्न आहे तसेच आहेत. स्लम भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रभागातील अनेक रस्त्यांची डागडुजी नाही.

समाधान जाधव, माजी नगरसेवक

इन्फो बॉक्स

संभाव्य उमेदवार

भाजप- रुची कुंभारकर, मच्छिंद्र सानप, पूनम मोगरे, प्रियंका माने, चंद्रशेखर पंचाक्षरी, कुसंम शिंदे, राष्ट्रवादी- गौरव गोवर्धने, अंबादास खैरे, समाधान जाधव, संतोष शिंदे, शंकर मोकळ, शिवसेना- हर्षद पटेल, रमेश शेवाळे, मनसे- संदीप भवर, सौरभ सोनवणे, सोमनाथ बोडके.

इन्फो बॉक्स

नागरी समस्यांकडे दुर्लक्ष

- प्रभागातील अनेक भागात रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या समस्या कायम आहेत.

- आपल्या निवासस्थानाच्या परिसरातच नगरसेवकांचे लक्ष आहे, अन्य भागात दुर्लक्ष

- प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, वीजतारा भूमिगत झाल्या नाहीत.

Web Title: Brotherhood of aspirants, including the battle of grandparents and former MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.