प्रभाग ३ मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

By Admin | Published: November 12, 2016 01:11 AM2016-11-12T01:11:53+5:302016-11-12T01:13:51+5:30

भाजपाकडे सर्वाधिक उमेदवा

Brother's brother in ward 3 | प्रभाग ३ मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

प्रभाग ३ मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

googlenewsNext

रसंदीप झिरवाळ  पंचवटी
नाशिक शहरातील सर्वात प्रतिष्ठेची लढत असणाऱ्या पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रभागातून भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे, तर काँग्रेस पक्षाला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजपाच्या सर्वच इच्छुकांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील दिल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाकडे इच्छुक असून यंदा नवीन चेहरे निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या जुन्या प्रभागरचनेनुसार या प्रभागात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहे. नवीन प्रभागरचनेनुसार प्रभागात २ जागा सर्वसाधारण महिला, १ नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर १ जागा सर्वसाधारण असल्याने सर्वसाधारण जागेतून इच्छुक निवडणूक रिंगणात उड्या घेण्याची शक्यता आहे. जुना प्रभाग क्र मांक ३, १०, व ११ मिळून नवीन प्रभाग क्र मांक ३ ची रचना करण्यात आली असून या प्रभागात गणेशवाडी, टकलेनगर, कृष्णनगर, जुना आडगाव नाका, विजयनगर, त्रिमूर्तीनगर, ओमनगर, हिरावाडीरोड, हिरावाडी, कमलनगर, शिवकृपानगर, धात्रक फाटा आदिंसह अन्य भागांचा समावेश करण्यात आला आहे. पंचवटीतील सर्वच प्रभागात झोपडपट्टीचा भाग जोडला असला तरी या प्रभागात बोटावर मोजण्याइतका झोपडपट्टीचा भाग जोडला गेला आहे.
सध्या या प्रभागातून भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी आमदार पुत्र, विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक आहेत, त्यातच भाजपाकडून सर्वच इच्छुकांना तयारीला लागा, असे सुचविल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळणार हे सांगणे आतातरी कठीण आहे. महिलांसाठी दोन जागा सर्वसाधारण असल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या काहींनी भाजपाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे भाजपाने जवळपास स्पष्ट केल्याने अशा इच्छुकांना ऐनवेळी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का, यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
सेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास इच्छुकांचा मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तूर्तास कोणत्याच पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नसली तरी ज्या त्या पक्षाकडून इच्छुक असलेल्यांनी प्रभागात प्रचाराचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपाशी टक्कर देण्यासाठी प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेला मोठी प्रचार यंत्रणा उभी करावी लागणार आहे.

Web Title: Brother's brother in ward 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.