घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

By admin | Published: September 10, 2014 10:38 PM2014-09-10T22:38:24+5:302014-09-11T00:26:42+5:30

घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

Brute robbery of the day | घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

Next

 

घोटी : शहराची व्याप्ती वाढल्याने पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात घरफोड्या, धाडसी चोऱ्या, पाळीव जनावरे चोरी अशा घटनांत वाढ होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. दरम्यान शहरातील भरवस्तीतून एक चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी धाडसाने चोरून नेल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनामुळे व्यापारी, नागरिक भयभीत झाले आहेत. शहराची व्याप्ती व घोटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र लक्षात घेता शहराच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून चोऱ्या रोखण्यास व उपाययोजना करण्यात अपयश आले असल्याने चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. शहरातील वाढत्या चोऱ्याची मालिका थांबविण्यासाठी घोटी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, शहरातील वासुदेव चौक व भंडारदरा चौफुलीवर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, घोटी शहरातील भरवस्तीतील युनियन बँकेसमोर उभी केलेली एम.एच.०१-एल. ए. ०६५० हे चारचाकी वाहन दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने शहरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत. याबाबत मालुंजे, ता.इगतपुरी येथील भाऊसाहेब बन्सी झणकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Brute robbery of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.