निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:52 AM2019-10-11T00:52:52+5:302019-10-11T00:53:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल ...

BSNL closed tower due to election | निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

Next
ठळक मुद्देसुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल टॉवर व दूरध्वनी नियंत्रण केंद्रे (टेलिफोन एक्स्चेंज) बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वीजबिलांचा भरणा : जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यंत्रणा होणार पूर्ववतनिवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरूविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेतील समन्वय आणि संपर्कात अडसर निर्माण होत असल्याने ही सर्व केंद्रे पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यातील सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापासून ते थेट मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीएसएनएलची मोबाइल अथवा दूरध्वनी सेवा अतिशय महत्त्वाची ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करतानाही बीएसएनएलला उशीर होत आहे. त्यातच जिल्हाभरातील सुमारे ८० ते ८५ मोबाइल टॉवरचे आणि १२५ ते १५० एक्सेंड अनियमित बिल भरण्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद होते.
त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत यंत्रणेशी समन्वय साधताना अडसर निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून महावितरण आणि बीएसएनएल या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाइल टॉवर व एक्स्चेंज सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात बीएसएनएलकडून काही प्रमुख केंद्रांचा व टॉवरचा वीजबिल भरणा केला जात असून प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले असून, उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू होणार आहेत. खंडित वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास प्रारंभबीएसएनएलच्या थकीत वीजबिलांमुळे एमएसईबीतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे मोबाइल टॉवर व टेलिफोन एक्स्चेंजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र याचा थेट निवडणूक यंत्रणेवर परिणाम झाल्याने अखेर राज्य शासनाने निवडणूक काळात एमएसईबीला बीएसएनएल आणि एमटीएनएलचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: BSNL closed tower due to election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.