आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:17 PM2019-09-14T13:17:40+5:302019-09-14T13:17:59+5:30

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो ...

BSNL's electricity supply to Pimpalgaon collapsed due to an outstanding balance of eight lakhs | आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

आठ लाखांच्या थकबाकीमुळे पिंपळगावच्या बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित

Next

पिंपळगाव बसवंत - गेल्या कित्येक दिवसांपासून पिंपळगाव शहरातील मोबाईल नेटवर्करची बत्ती गुल्ल झाल्याने आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधत आहे.तो नंबर अस्तित्वातच नाही. अशा उत्तराने पिंपळगावचे नागरिक परेशान झाले आहे. फोन केला की नॉट रिचेबल सारख्या उत्तराने पिंपळगावकर हैराण झाले आहे.याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएल कंपनीने महावितरण विभागाचे बिलच भरले नसल्याने या टॉवरची वीज खंडित केली असल्याचा प्रकार उघडीस आल्याने बीएसएनएल कंपनीच्या नेटवर्कवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना नेटवर्कच अस्तित्वात नसल्याचा धक्काच बसला आहे.
महावितरणकडून पिंपळगाव बसवंत येथील आठ बीएसएनएल टी.डी टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात आला असून यामुळे या टॉवरवरून सुरू असलेली नेटवर्क सेवादेखील ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणकडून थकीत वीजबील ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी विभागांचादेखील समावेश आहे. पिंपळगावमधील बीएसएनएलच्या टी.डी टॉवरला आठ वीजमीटर होते .त्यांचे तब्बल ७ लाख ८३ हजार एवढे वीज बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे महावितरणकडून टॉवरसाठी लावण्यात आलेले वीजमीटरच बंद करण्यात आले आहेत.
याबाबत बीएसएनएलला संपर्क केला असता बीएसएनएलच्या कार्यालयीन कामकाजाचा निधी दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. निधी येताच आम्ही वीजबिल भरणार आहोत. दोन्ही सेवा सरकारी आहेत. आम्ही महावितरणशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. महावितरण विभागाकडून सिंगल फेज वीज जोडणी मिळाल्यास परिसरातील इंटरनेट सेवा सुरळीत करता येईल, असे सांगितले जात आहे.
--
बीएसएनएलकडून आठ वीजमीटरचे मिळून ७ लाख ८३ हजार रु पये एवढे वीजबिल थकीत आहे. ही थकबाकी २०१८ ते १९ या कालावधीतील आहे. त्यामुळे महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. थकीत वीजबिल भरल्यास वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- गायत्री गावित, सहाय्यक अकाऊंट , महावितरण विभाग
.....................................
बीएसएनएल वीज पुरवठा बंद केल्यामुळे तसेच महावितरण विभागाचे त्या संबंधित ट्रॉवरचे वीज बिल थकले असल्याने त्या परिसरातील नेटवर्क बंद आहे. आम्ही या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्र ार केली असून नेटवर्क लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत.
-वर्षा भंगाळे, बीएसएनएल अधिकारी
.............................
जर ग्राहकांकडून मोबाईलचे बिल वेळेवर भरले जातात मग त्यांना योग्य नेटवर्कची सेवा का पुरवली जात नाही. ‘रेंज न मिळणे व सतत नेटवर्क ‘इमर्जन्सी कॉल्स ओन्ली’ अशा मोडवर जाणे. इंटरनेट स्पीड नसणे किंवा मध्येच इंटरनेट बंद होणे, हा सुद्धा पिंपळगाव मध्ये नेटवर्कचा सर्वात मोठा त्रास गेल्या कित्येक दिवसापासून आहे.
-राजा बुब, त्रस्त नागरिक, पिंपळगाव बसवंत
 

Web Title: BSNL's electricity supply to Pimpalgaon collapsed due to an outstanding balance of eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक