नाशिकसह महाराष्टÑात मार्चपर्यंत बीएसएनएलची फोर-जी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:40 AM2018-10-02T00:40:56+5:302018-10-02T00:43:39+5:30
नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या मार्चपर्यंत महाराष्टÑात फोरजी सेवा सुरू होणार आहे. त्याचा मोठा लाभ नागरिकांना होईल, असा विश्वास भारत दूरसंचार निगम लिमिटेडचे वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन यांनी व्यक्त केला आहे.

येत्या ८० दिवसांत केंद्र सरकारच्या माध्यमातून निगमला फोरजी सेवेसाठी स्पेक्ट्रम उपलब्ध होणार असून त्यानंतर ही सेवा महाराष्टÑात सुरू होईल. राज्यासाठी सहा हजार टॉवर मंजूर झाले असून, नाशिक जिल्ह्णासाठी ६३० फोरजी टॉवरचा त्यात समावेश
आहे. सध्या असलेल्या टॉवरमध्ये एक छोटे कार्ड बदलल्यानंतर फोरजी सेवा सुरू होईल. त्यामुळे निगमच्या ग्राहकांना २० ते ४० एमबीपीएस स्पीड मिळेल, असेही महान यांनी सांगितले.
निगमने ६३० साईट्सवर थ्रीजी टॉवर उभारले असून त्यामुळे नाशिक शहराबरोबरच मनमाड, येवला, सटाणा, मालेगाव शहर, इगतपुरी यांसह सर्व तालुक्यांच्या ठिकाणी थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ झाला आहे. केवळ तालुका ठिकाणच नव्हे तर ननाशी, निगडोळ, अंदरसूल, पाटोदा, वडांगळी, ठाणगाव, ताहाराबाद, नामपूर, लखमापूर याठिकाणीही ही सेवा दिली जाणार असल्याची माहिती नितीन महाजन यांनी दिली.
थ्रीजी सेवा सुरू झाल्यानंतर नाशिक शहर आणि ग्रामीण भागात आठ हजार सीम काडर््सचे वाटप सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णात विविध खासगी कंपन्यांच्या थ्रीजी सेवा असल्या तरी निगमच्या सेवेला स्पर्धात्मकदृष्ट्या अधिक स्पीड असल्याचे ते म्हणाले.
डाउनलोडिंगमध्ये नाशिक दुसरेमहाराष्टÑात निगमच्या मोबाइल डेटा डाउनलोडिंगमध्ये नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिकमध्ये पंधरा हजार जीबी डाउन लोड होतात. तर पुणे प्रथम क्रमांकावर असून, पुण्यात सतरा ते अठरा हजार जीबी डाटा रोज डाऊनलोड होत असतो.३८२ ग्रामपंचायती झाल्या डिजिटलनाशिक जिल्ह्णातील ६१० ग्रामपंचायतींना निगमने फायबर आॅप्टिकलने जोडले असून, ३८२ ग्रामपंचायतींनी निगमकडे पैसे भरून नियमित इंटरनेट सेवा सुरू केली आहे, त्यामुळे या ग्रामपंचायती क्षेत्रातील नागरिकांना अनेक सेवा आणि दाखले त्यावरून प्राप्त होत आहेत.