बुवाजी बाबा यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:03 PM2020-02-24T23:03:31+5:302020-02-25T00:26:52+5:30
नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते.
निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते.
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या प्रारंभाला दोन दिवस श्रीक्षेत्र बुवाजी बाबांचा यात्रोत्सव साजरा केला जातो. सोमवारपासून (दि. २४) दोनदिवसीय यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी प. पू. बुवाजी अहिलाजी पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०
वाजता बुवाजी बाबा यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ह.भ.प. अनिल महाराज मंडलिक यांचे कीर्तन झाले.
भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन बुवाजी पुणेकर, महंत बबन सांगळे, सोमनाथ सांगळे, उमाजी पुणेकर, भीमाजी पुणेकर, विष्णू सांगळे, ज्ञानदेव सांगळे यांच्यासह निºहाळे-फत्तेपूर ग्रामस्थांनी केले आहे. मंगळवारी (दि. २५) सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायाणाचार्य अरुणगिरी महाराज (अडबंगनाथ संस्थान, भामाठाण) यांचे कीर्तन होणार आहे. दिवसेंदिवस यात्रेला भाविकांची गर्दी वाढत आहे. राज्यभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.