मक्यासह बाजरीच्या कणसांना शेतातच फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 02:21 PM2019-10-23T14:21:11+5:302019-10-23T14:23:14+5:30
उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
उमराणे : गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उमराणेसह परिसरातील खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या मका, बाजरी पिकांच्या कणसांना शेतातच कोंब फुटू लागल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकविम्याची रक्कम मिळवुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन आठवड्यापूर्वी परतीच्या पावसाने झोडपल्यानंतर उंबºयावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही झळ सोसून अस्मानी संकटातून वाचलेल्या पिकांची सोंगणी व कापणी सुरु असतानाच गेल्या सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतात कापुन पडलेल्या बाजरी व मका पिकांच्या चाºयाची नासाडी तर झालीच परंतु लष्करी अळींच्या तावडीतून थोड्याफार प्रमाणात वाचलेल्या कणसांनाही पावसामुळे शेतातच कोंभ फुटू लागल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.पावसामुळे शेतातील कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांना लवकर पाऊस उघण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान चालू वर्षी जवळपास सर्वच शेतकर्यांनी पिकविमा काढला असुन खिरपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ महसुल विभागामार्फत पंचनामे करु न नुकसानभरपाई म्हणून विमारक्कम जाहीर करावी अशी मागणी बाधीत शेतकर्यांकडुन जोर धरू लागली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळाची झळ सोसल्यानंतर चालुवर्षी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेल्या शेतकर्यांना सुरु वातीपासूनच अस्मानी सुलतानी संकटांना सामोरे जावे लागले असुन सुरु वातीला पावसाचे उशिरा आगमन, त्यानंतर मका व बाजरी पिंकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव, त्यानंतर परतीचा पाऊस व पुन्हा गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिणामी पिकांपासुन मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही या अस्मानी सुलतानी संकटामुळे वसुल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.