बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:41 AM2018-04-29T00:41:35+5:302018-04-29T00:41:35+5:30

एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यावर येतो. कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२ वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार.

Buddha Drawing Artist on the pages of Bodhi Vriksha | बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत

बोधीवृक्षाच्या पानांवर बुद्ध रेखाटणारा कलावंत

googlenewsNext

नाशिक : एखादा छंद जेव्हा मनुष्य जोपासतो तेव्हा त्याच्या मनात एकाकीपणाची भावना येऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे; मात्र एकापेक्षा अधिक छंद जोपासत एखादी व्यक्ती जगत असते तेव्हा त्याचे ते जगणे तितकेच समृद्ध असते, याचा प्रत्यय उपनगरमधील अरुण जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यावर येतो. कलेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या या ७२ वर्षीय तरुण कलावंताचे आगळे वैशिष्ट म्हणजे बोधीवृक्षाच्या पर्णावर कुंचल्याचा बहुरंगी आविष्कार.  तथागत गौतम बुद्धांचे एकापेक्षा एक सरस बोलक्या भावमुद्रा या कलाप्रेमीने आपल्या कुंचल्यातून लिलयापणे बोधीपर्णावर साकारल्या आहेत हे विशेष! गांधीनगर मुद्रणालयातून सेवानिवृत्त झालेले जाधव हे उपनगरमधील दत्तप्रसाद अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी लहानपणीचा मित्र सुरेश सोनवणेकडून कला आणि त्यावर प्रेम कसे करायचे ते शिकले. चित्रकलेचा शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम न शिकता केवळ आवड आणि छंद म्हणून जोपासलेल्या कलेद्वारे जाधव हे एखाद्या कला महाविद्यालयाच्या चित्रकारालाही लाजवेल अशा एकापेक्षा एक सरस चित्राकृती रेखाटतात. त्यांच्या चित्राकृती कॅन्व्हासवर अधिक आकर्षक दिसतातच; मात्र त्यापेक्षाही अधिक सुंदर बोधी वृक्षाच्या पर्णावर दिसतात. भगवान गौतम बुद्धांचे विविध भावमुद्रा त्यांनी बोधीवृक्ष अर्थात पिंपळपानावर रेखाटल्या आहेत.
बोलक्या चित्राकृती
कॅनव्हासवर चित्र रेखाटणे हे कला महाविद्यालयातून चित्रकलेचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्याला सोपे होते; मात्र कुठल्याही महाविद्यालयात चित्रकलेचे धडे न घेता केवळ एका मित्राची कला बघून तसा प्रयत्न करत आलेल्या अनुभवातून कॅ नव्हासवर नव्हे तर थेट पिंपळाच्या पानावरच चित्र रेखाटण्याचे अद्भुत तंत्र जाधव यांना आत्मसात आहे. पिंपळपानावर त्यांनी रेखाटलेल्या सर्व चित्राकृती जणू संवादच साधतात असाच भास होते. इतक्या बोलक्या आणि आकर्षक रंगसंगतीची जोड असलेल्या या चित्राकृती जिवंत वाटतात.
पिंपळपानच त्यांचे कॅनव्हास
जाधव यांनी कॅनव्हासवर कुंचल्याचा आविष्कार दाखविण्यास तितकी पसंती दिली नाही जितकी पिंपळाच्या पानाला दिली. या कलाप्रेमी चित्रकाराने पिंपळाचे पान भिजवून ते वाळल्यावर त्यामध्ये हुबेहूब व्यक्तीचित्र रेखाटण्याची वेगळीच कला शिकली आहे. जाळीदार पिंपळाचे पान हे या कलाकाराचे आवडते कॅनव्हास आहे. त्यांनी यामध्ये मेटालिक, अ‍ॅक्रेलिक रंगाचा वापर करत चित्राकृती साकारल्या आहेत.

Web Title: Buddha Drawing Artist on the pages of Bodhi Vriksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.