बौद्धसंस्कार : त्रिरश्मी लेण्यावर श्रमणोर शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 01:30 PM2018-05-05T13:30:45+5:302018-05-05T13:30:45+5:30
त्रिरश्मी लेणी येथे लहान मुलांसाठी बालसंस्कार श्रमणोर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
नाशिक : उन्हाळी सुटीच्या दिवसात लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, कला आणि साहसी खेळांची शिबिरे आयोजित केली जातात. त्याप्रमाणेच त्रिरश्मी लेणी येथे लहान मुलांसाठी बालसंस्कार श्रमणोर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, बौद्ध तत्त्वज्ञान शिकण्यासाठी जिल्हाभरातील सुमारे 80 मुले येथे बौद्धसंस्कार शिकत आहेत.
त्रिरश्मी लेणी येथे बुद्ध जीवनशैलीची असलेली 24 लेणी तसेच पायथ्याशी असलेले बुद्धस्तुप अशा वातावरणात या ठिकाणी श्रमणोर शिबिर घेण्यात येत आहे. भल्या पहाटेपासून केशरी चिवर परिधान केलेली बालके बौद्धसंस्काराचे पाठ शिकत आहेत. लेण्यावरही त्यांना बौद्धसंस्कृती माहिती दिली जात आहे.