मनपाचे अंदाजपत्रक १७ रोजी स्थायीवर
By admin | Published: April 12, 2017 01:06 AM2017-04-12T01:06:47+5:302017-04-12T01:07:31+5:30
मनपाचे अंदाजपत्रक १७ रोजी स्थायीवर
नाशिक : महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि.१७) प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन स्थायी समितीला सादर करणार आहेत.
महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी फेब्रुवारीच्या २० तारखेपर्यंत स्थायी समितीला सादर होणे आवश्यक असते. यंदा महापालिका निवडणुकीमुळे अंदाजपत्रक तयार असूनही सादर करता आलेले नाही. गेल्या आठवड्यात स्थायी समिती गठित होऊन सभापतिपदी भाजपाचे शिवाजी गांगुर्डे विराजमान झाले आहेत. त्यामुळे स्थायीला अंदाजपत्रक सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार, येत्या १७ एप्रिलला प्रभारी आयुक्त बी. राधाकृष्णन् स्थायी समितीला सकाळी ११ वाजता अंदाजपत्रक सादर करणार आहेत. आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी यापूर्वीच यंदा अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीचे संकेत दिले असून, मागील वर्षाच्या तुलनेत विकासकामांना बरीच कात्री लावल्याचे समजते.