‘स्थायी’वर आज मनपाचे अंदाजपत्रक

By admin | Published: February 25, 2016 11:05 PM2016-02-25T23:05:38+5:302016-02-25T23:13:57+5:30

आयुक्त करणार सादर : मागील अंदाजपत्रक ठरले फसवे

Budget estimates today on 'Permanent' | ‘स्थायी’वर आज मनपाचे अंदाजपत्रक

‘स्थायी’वर आज मनपाचे अंदाजपत्रक

Next

नाशिक : महापालिकेचे सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम शुक्रवारी (दि. २६) स्थायी समितीला सादर करणार आहेत. महापालिकेची एकूणच चहुबाजूने झालेली आर्थिक कोंडी लक्षात घेता अंदाजपत्रकात विकासकामांसाठी भरीव अशी तरतूद आणि नावीन्यपूर्ण योजनांचा अंतर्भाव होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, मागील अंदाजपत्रकात आयुक्तांनी समाविष्ट केलेल्या बऱ्याच योजना पूर्णत्वाला जाऊ न शकल्याने अंदाजपत्रक फसवे ठरले आहे.
महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी मागील वर्षी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे आपल्या कारकीर्दीतील पहिले अंदाजपत्रक सादर केले होते. आयुक्तांनी १४३७ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करताना त्यात अनेक योजनांचा अंतर्भाव केला होता शिवाय काही संकल्पही सोडले होते. मागील वर्षी स्पीलओव्हर ५५८ कोटी रुपयांचा दाखविताना विविध विकासकामांसाठी केवळ २२९ कोटी रुपयेच उपलब्ध होतील, अशी तरतूद दाखविली होती. यंदा स्पीलओव्हर ७६२ कोटींवर जाऊन पोहोचला असून विकासकामांसाठी किती निधी उपलब्ध होईल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आयुक्तांनी मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात फाळके स्मारक आणि उद्यानांच्या खासगीकरणाचा मानस व्यक्त केला होता. परंतु वर्षभरात फाळके स्मारकाच्या खासगीकरणाचा मुद्दा अधांतरीच राहिला. एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून फाळके स्मारकाचा विकास करण्याची चाचपणी सुरू असली तरी अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नाही.

Web Title: Budget estimates today on 'Permanent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.