मुख्यलेखापालांना सांगता येईना बजेटची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:27 AM2021-02-18T04:27:14+5:302021-02-18T04:27:14+5:30

महापालिकेचे आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारी (दि. १६) स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना सादर केला. ...

Budget figures cannot be disclosed to the Chief Accountant | मुख्यलेखापालांना सांगता येईना बजेटची आकडेवारी

मुख्यलेखापालांना सांगता येईना बजेटची आकडेवारी

Next

महापालिकेचे आगामी वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारी (दि. १६) स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना सादर केला. यावेळी हा प्रकार घडला.

सभापती गणेश गिते यांनी समितीच्या कार्यकाळासाठी अपुरा कालावधी लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ न करताच हा अर्थसंकल्प मंजुर करण्यात येईल अशी घाेषणा केली. त्यापूर्वी आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केल्यानंतर हा प्रकार घडला.

महापालिकेच्या अंदाजपत्रकातील गेल्या वेळेसची महसूली जमा किती त्यात भांडवली जमा धरून किती रक्कम होते अशी विचारणा केली असता त्यांनी अनेक उत्तरे चुकीची दिली. त्यातून गोंधळ वाढत गेला. त्यांची धावपळ बघून अजय कमोद यांनी त्यांना आकडेवारी शोधून दिली परंतु गेांधळ मिटलाच नाही. अंदाजपत्रकाचा मुळ आधारच चुकीचा असेल तर अंदाजपत्रक कसे वास्तव असू शकेल असा प्रश्न करीत बडगुजर यांनी लेखापालांनी हे अंदाजपत्रक कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून तयार करून घेतले का असा टोलाही लगावला.

Web Title: Budget figures cannot be disclosed to the Chief Accountant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.