अर्थसंकल्पाने पहिल्यांदाच केला १०० कोटींचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:02 PM2019-03-01T17:02:52+5:302019-03-01T17:03:42+5:30
सिन्नर : नगरपरिषदेच्या २०१९-२० च्या १ कोटी २ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.
सिन्नर : नगरपरिषदेच्या २०१९-२० च्या १ कोटी २ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. स्थायी समितीसमोर सादर केलेल्या आराखड्यात काही दुरुस्त्या सुचवून यास मंजूरी देण्यात आली. नगरपरिषदेच्या इतिसात प्रथमच १०० कोटींच्या वरच अर्थसंकल्प पोहचला. रस्ते, बंदिस्त गटारी, मैला व्यवस्थापन, पाणीपुरवठा या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष भर देण्यात आला. कोणतीही दरवाढ न करता व मालमत्ताकर कमी करुनही उत्पन्नात दीड कोटींचे वाढ असलेला अर्थसंकल्प आहे. नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी अर्थसंकल्प सादर केला. उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, पंकज मोरे, गोविंद लोखंडे, बाळासाहेब उगले, श्रीकांत जाधव, रुपेश मुठे, सुहास गोजरे, सोमनाथ पावसे, नामदेव लोंढे, रामनाथ लोणारे, मल्लू पाबळे, सुजाता भगत, सुजाता तेलंग, ज्योती वामने, मंगला शिंदे, विजया बर्डे, नलिनी गाडे, चित्रा लोंढे, प्रतिभा नरोटे, वासंती देशमुख यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. महसूली उत्पन्नाच्या माध्यमाने सुमारे २ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपये उत्पन्नाच्या तिजोरीत जमा होण्याची अपेक्षा आहे. शासकीय योजनांच्या माध्यमाने शहराच्या विकासासाठी तसेच विविध घटकांसाठी सुमारे ४० कोटी २० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. सत्ताधारी शिवसेनेने मालमत्ता कर कमी करण्याचे वचन नागरिकांना दिले होते. हा कर नुकताच कमी करण्यात आला. ७० ते ८० टक्के मालमत्तांचा कर कमी होवूनही दीड कोटींच्या उत्पन्नाची भर पडली आहे. गत अर्थसंकल्पात तीन कोटी २५ लाख या करातून मिळाले. नवीन अर्थसंकल्पानुसार आता चार कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत. कडवा पाणी योजना येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाणार असल्याने वर्षभरात वीज देयकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पळसे येथील पंपींग स्टेशनसाठीही तेवढीच तरतूद ठेवण्यात आली आहे. मैला व्यवस्थापनावर ५० लाख रु पये खर्च अपेक्षीत आहे. खुल्यां जागांचा विकास करण्यासाठी ५० लाख रु पये खर्च होणार आहेत. हुतात्मा स्मारक परिसराच्या विकासासाठीही पाच लाख रु पये खर्च केले जाणार आहेत. रस्ते बांधकामासाठी दोन कोटींची तरतूद, गटारी बांधकामासाठी १ कोटींची तरतूद, नायगाव रोडवरील शॉपिंग सेंटर बांधकामाला दीड कोटी रुपये खर्च अशी तरदूद करण्यात आली आहे.