प्रत्येक जिल्ह्यात युरियाचा बफर स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:10+5:302021-05-13T04:15:10+5:30

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे ...

Buffer stock of urea in each district | प्रत्येक जिल्ह्यात युरियाचा बफर स्टॉक

प्रत्येक जिल्ह्यात युरियाचा बफर स्टॉक

Next

खरीप हंगामासाठी खतांची उपलब्धता आणि पुरवठा याबाबत कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रालयात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व विविध खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर दर सोमवारी खतांच्या उपलब्धतेबाबत आढावा बैठक घ्यावी. यंदा हवामान विभागाने मान्सून चांगला होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने खतांची मागणी एकाचवेळी वाढली. त्यामुळे काही ठिकाणी तुटवडा जाणवला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा दीड लाख मेट्रिक टन युरियाचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ विभागासाठी विदर्भ सहकारी पणन मंडळ व महाराष्ट्र कृषी औद्योगिक मंडळ या दोन यंत्रणांच्या सहकार्याने सर्व जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे.

कंपन्यांनी खतपुरवठ्याचे जे नियोजन आणि वेळापत्रक केले आहे त्यानुसार त्याचा पुरवठा वेळेवर होतो की नाही याची क्षेत्रिय यंत्रणांनी खातरजमा करावी. पुढील दोन महिने अलर्ट राहून मागणीप्रमाणे खतपुरवठ्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देशही कृषिमंत्री भुसे यांनी या वेळी दिले.

इन्फो

राज्यात २२ लाख मे. टन खत शिल्लक

या वर्षी केंद्र शासनाकडून ४२ लाख ५० हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. सध्या राज्यात २२ लाख ५६ हजार मेट्रिक टन साठा शिल्लक असून, त्यामध्ये युरिया ५ लाख ३० हजार मेट्रिक टन, डीएपी १ लाख २७ हजार मेट्रिक टन, संयुक्त खते ९ लाख ७२ हजार मेट्रिक टन अशा प्रकारे खतांचा साठा उपलब्ध आहे.

Web Title: Buffer stock of urea in each district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.