रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवरच मंडप उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:11 AM2018-09-04T01:11:39+5:302018-09-04T01:11:58+5:30

रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे.

 Build a pavilion on a quarter of the road | रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवरच मंडप उभारा

रस्त्याच्या एक चतुर्थांश जागेवरच मंडप उभारा

Next

नाशिक : रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे.  येत्या १३ आॅगस्ट रोजी होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिकेकडे परवानगी मागणे आणि त्यांना परवानगी देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे महापालिकेने एक खिडकीची व्यवस्था केली आहे. शिवाय आॅनलाइन परवानगीचीदेखील व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता त्यादृष्टीने ध्वनीवर्धकाच्या वापरावा मर्यादा, नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनस्थळी निर्माल्य कलश, कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सोय, सजावटीसाठी थर्माकोल ऐवजी इको फ्रेंडली साहित्याचा वापर, प्लास्टर आॅफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या मूर्ती आणि सार्वजनिक मंडळांच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मोठ्या मूर्तीऐवजी छोट्या मूर्तीचे विसर्जन याबाबींची दक्षता घेण्याच्या सूचनादेखील करण्यात आली आहे.
मंडपासाठी तरतुदी
नाशिक मनपाची सर्व विभागीय कार्यालये, शहर वाहतूक शाखा, पोलीस विभाग व अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करण्यात येईल. त्यानुसार संबंधित विभागांच्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अटी/शर्तीचे पालन करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर बंधनकारक राहील.
उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये मंडप उभारणी करणेकरिता रस्त्यांवर खड्डे न होण्याची दक्षता घेणे आवश्यक आहेत तसेच मंडप व कमानी उभारणी करताना खांब रोवण्यासाठी वाळूच्या ड्रमचा वापर करावा. मंडपापासून १५ मीटरपर्यंत विद्युत रोषणाई करता येईल.
वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरातीस कर लागू आहे.
दुर्घटना घडू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. नोंदणीकृत कंत्राटदाराकडून विद्युत विषयक कामे करून घेण्यात यावीत.
श्री गणेशमूर्ती, मंडप व नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक व गर्दीचे नियोजनात मंडळाचा सहभाग असणे आवश्यक आहे.
आवश्यक सर्व ना-हरकत दाखले, मंडप परवानगी तसेच कायदा व पालन करणे बंधनकारक आहे.
परवानगीची कार्यवाही अशी
विभागीय अधिकाºयांमार्फत अर्जाची छाननी करण्यात येईल.
छाननीअंती नाकारलेल्या अर्जांची कारणे अर्जदारास आॅनलाइन कळविण्यात येतील.
पोलीस, शहर वाहतूक व अग्निशमन विभागाने मंडळाकडून अर्ज मिळालेनंतर ५ दिवसांच्या आत ना-हरकत प्रमाणपत्र देणेचे आहे.
ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर, स्थळदर्शक नकाशात दर्शविल्यानुसार मनपा विभागीय कार्यालयातील उपअभियंता यांनी ३ दिवसात जागेची पाहणी करून अहवाल सादर करावयाचा आहे.
मंडपामुळे वाहतूक सुरळीत राहील व नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत संबंधित उपअभियंता आपले अभिप्राय नोंदवून जागेचे रेखांकन करतील तसेच जीपीआरएसद्वारे स्थळदर्शक फोटो अपलोड करतील.
सदरची कार्यवाही पूर्ण होताच, अर्जदारास मेसेज व मेलद्वारे कळविण्यात येईल.
तद्नंतर अर्जदाराने शुल्क भरून विभागीय कार्यालयात पावती सादर करावी अथवा आॅनलाइन अपलोड करावी.
उपरोक्त पूर्तता झाल्यावर संबंधित विभागीय अधिकारी ३ दिवसांत परवानगी पत्र आॅनलाइन अपलोड करतील.
मंडप परवानगीची कार्यप्रणाली अशी
मंडप उभारणी परवानगीसाठी विहित नमुन्यात अथवा महापालिकेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करावयाचा आहे.
उत्सव सुरू होण्याच्या दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत परवानगी देण्यात येईल.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक असून यात मंडपाचा स्थळदर्शक नकाशा, धर्मादाय उपायुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सार्वजनिक मंडळाचे नाव व पत्ता आणि पदाधिकारी, सदस्यांची यादी व दूरध्वनी संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे.

Web Title:  Build a pavilion on a quarter of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.