पदाची किंमत कार्यातून निर्माण करा

By admin | Published: September 30, 2015 11:29 PM2015-09-30T23:29:32+5:302015-09-30T23:31:57+5:30

प्रकाश लोंढे : आरपीआयचा कार्यकर्ता मेळावाना

Build up the post from the job | पदाची किंमत कार्यातून निर्माण करा

पदाची किंमत कार्यातून निर्माण करा

Next

शिकरोड : पदापेक्षा कार्य मोठे पाहिजे, पदाची किंमत तुमच्या कार्यातून निर्माण करा. स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केले.
देवळालीगाव येथील महात्मा गांधी सभागृहात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना लोंढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष वाढविण्याचे काम करावे. आठवलेंच्या नावाचा गैरवापर करून मिरवणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असे लोंढे यांनी स्पष्ट केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा मान व दर्जा वाढेल, असे सामाजिक काम करून पदाचा उपयोग पावती पुस्तकासाठी न करता समाजाच्या कामासाठी करा, असे आवाहन लोंढे यांनी केले.
आंबेडकरांची १२५ वी जयंती, ३ आॅक्टोबरला पक्षाचा वर्धापनदिन व १३ आॅक्टोबरला येवला येथील मुक्तीभूमीवरील कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहन लोंढे यांनी केले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक सुनील वाघ होते. व्यासपीठावर प्रियकीर्ती त्रिभुवन, विश्वनाथ काळे, फकिरा जगताप, अमोल पगारे, विनोद जगताप, इ. एन. निकम, अर्जुन पगारे, पवन क्षीरसागर, सुनील कांबळे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, अविनाश शिंदे, रामबाबा पठारे, माधुरी भोळे, विजया केदारे, प्रीती भालेराव, नाजाबाई सोनवणे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, सुरेखा भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नाशिकरोड अध्यक्ष समीर शेख यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप दासवानी व आभार भारत निकम यांनी मानले. यावेळी युवक अध्यक्ष दिनेश जाधव, भारत निकम, राजाभाऊ वानखेडे, सनी साळवे, हर्षल जाधव, भारत खेडकर, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, जाहीर पठाण, एजाज शेख, दीपक सावंत, गोटीराम पवार, सुनील यशवंते आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Build up the post from the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.