अंबडच्या राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:39+5:302021-07-28T04:14:39+5:30
नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबड औद्योगिक वसाहतीत मंजूर विकास आराखड्यात ट्रक टर्मिनलसाठी ५ ...
नाशिक ड्रिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबड औद्योगिक वसाहतीत मंजूर विकास आराखड्यात ट्रक टर्मिनलसाठी ५ एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. ही जागा सर्व सोयीसुविधांसाठी पुरेशी आहे. या ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित होण्याबाबत यापूर्वी वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे; परंतु कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. आरक्षित जागेत ट्रक टर्मिनल उभे रहावे ही मागणी प्रलंबित असतानाच या भूखंड आरक्षणात बदल करून खासगी कंपनीला विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. ही बेकायदेशीर बाब असून, त्याबाबत असोसिएशन कायदेशीर मार्गाने जाणार आहे. चौफेर विकसित होणाऱ्या शहरात विशेषत: औद्योगिक परिसरात ट्रक टर्मिनल असणे महत्त्वाचे आहे. ट्रकवरील चालक व क्लिनर हे बाहेर राज्यातील असल्याने त्यांची राहण्याची, उपाहारगृह, स्वच्छतागृह, विश्रांतीगृह, वाहन दुरुस्तीसाठी गँरेज, डिझेलपंप, वजनकाटा, स्पेअर पार्ट दुकान, गोडावून, सर्व्हिस स्टेशन, प्रशिक्षण हॉल, प्रथमोपचारासाठी व्यवस्था असावी. अवजड वाहनांना शहरात पार्किंगसाठी हक्कांची जागा नसल्याने अवजड वाहने हे रस्त्यात अथवा मिळेल त्या ठिकाणी उभे केले जातील व त्यामुळे शहराच्या वाहतुकीच्या समस्येत फार मोठी भर पडले, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, पी. एम. सैनी, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, सुभाष जंगडा, जयपाल शर्मा, विशाल पाठक, शंकर धनावडे, संजय राठी, महेंद्रसिंग राजपूत, दीपक ढिकले, दीपक पांडे, राजेश शर्मा, रतन पडवळ, विनोद कुमार आदी उपस्थित होते.
(फोटो २६ ट्रक) ट्रक टर्मिनल उभारणीच्या मागणीचे निवेदन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना देताना आमदार सीमा हिरे. समवेत राजेंद्र फड, पी. एम. सैनी, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, सुभाष जंगडा, जयपाल शर्मा आदी.