बांधकाम व्यावसायिक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:41+5:302021-05-28T04:11:41+5:30
------------------- वाहनचालकांवर उपासमारीची वेळ मनमाड : मागील वर्षभरापासून कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे सर्वच घटकांना फटका बसला ...
-------------------
वाहनचालकांवर उपासमारीची वेळ
मनमाड : मागील वर्षभरापासून कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे सर्वच घटकांना फटका बसला आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे खासगी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. ग्रामीण भागातील खासगी वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीमुळे घाबरलेले लोक वाहनाकडे फिरकत नाहीत. शासन, प्रशासन खासगी वाहनधारकांचा प्रश्न समजून घ्यायला तयार नाही. वाहनावर असलेले कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ खासगी वाहनधारकांवर आली आहे.
--------------------
डुकरे, श्वानांचा सुळसुळाट
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून अनेकदा करण्यात आली आहे. डुकरांचे व कुत्र्यांचे टोळके गल्लोगल्ली फिरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------
ग्रामीण प्रवाशांची गैरसोय
नायगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून एसटीची प्रवासी वाहतूक बंद आहे. याशिवाय, खासगी वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आल्याने गोरगरीब ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा बंद असल्याने रस्ते सुने झाले आहेत.
--------------------
नांदूरशिंगोटे परिसरात शेतीकामाची लगबग
नांदूरशिंगोटे : पेरणीचे दिवस जवळ आल्याने नांदूरशिंगोटे येथे व परिसरात शेतीकामाची लगबग सुरू झाली आहे. काडीकचरा वेचून, जाळून शेती तयार करण्यात येत आहे. सकाळपासूनच शेतकरी, शेतमजूर या कामात गुंतल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
--------------------
नांदूरशिंगोटेत लसीकरण
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के यांनी लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडे मागणी केली होती. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने येथील जिल्हा परिषद शाळेत ९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.