बांधकाम व्यावसायिकांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:26 AM2018-07-29T00:26:54+5:302018-07-29T00:27:50+5:30

बांधकाम व्यवसायातील गुणवत्ता ही या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यावर टिकून असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून गुणवत्तापूर्ण काम करण्याची गरज आहे.

 Builders should not compromise quality | बांधकाम व्यावसायिकांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये

बांधकाम व्यावसायिकांनी गुणवत्तेशी तडजोड करू नये

Next

नाशिक : बांधकाम व्यवसायातील गुणवत्ता ही या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यावर टिकून असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून गुणवत्तापूर्ण काम करण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता हाच मूळ पाया असून, या क्षेत्रात काम करताना कोणत्याही परिस्थितीत अभियंत्यांनी कामच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये, असे प्रतिपादन हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी केले आहे.  असोसिएशन आॅफ कन्सल्ंिटग सिव्हिल इंजिनियर्स नाशिक शाखेतर्फे आयोजिक ‘इन्फ्रा सीई-२०१८’ या ‘शास्वत विकास’ विषयावरील राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलेत होते. हिरानंदानी यांनी अभियंत्यांना गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आवाहन केले, तर आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी परवडणाºया घरांच्या निर्मितीसाठी बांधकाम करतांना अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी गृहनिर्माण व्यवसायातील बांधकाम खर्च कमी करण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तत्पूर्वी व्ही. सुरेश यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. शास्वत शहरीकरणासह विविध पैलू उलगडतांना त्यांनी बांधकाम क्षेत्रातील विविध अडचणी व समस्यांविषयी अभियंत्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अभय साखरे यांनी परवडणारी घरे विषयांवर मार्गदर्शन करताना २०१९ पर्यंत बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले. डॉ. शिवकुमार बाबू यांनी घणकचरा व्यवस्थापन व त्याचे विविध प्रकार जमीन भरण्यावर होणारे परिणाम व त्यासाठीचे शास्त्रीय उपायही सुचविले.  अजित सबनीस यांनी शास्वत शहरीकरणाविषयी बोलताना शहर विकासाच्या अडचणींसोबतच विविध जटिल समस्यां व शक्यतांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी असोसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनियर्सच्या पश्चिम विभाग उपाध्यक्ष विजय सानप व जिल्हाध्यक्ष पुनित राय, अमित सानप यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दरम्यान, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया अभियंत्यासह बांधकाम व्यावसायिकांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते विशेष प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title:  Builders should not compromise quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक