पंचवटी भागात इमारत कोसळली, जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:40 AM2019-07-08T10:40:30+5:302019-07-08T10:41:09+5:30

मखमलाबाद नाका येथे हर्षवर्धन सोसायटी असून सदर इमारत सुमारे 35 ते 40 वर्षांपूर्वीची जुनी असल्याने धोकेदायक झाली होती.

The building collapsed in Panchavati area | पंचवटी भागात इमारत कोसळली, जीवितहानी नाही

पंचवटी भागात इमारत कोसळली, जीवितहानी नाही

googlenewsNext

नाशिक: मखमलाबाद नाक्यावर काल  रविवारी (दि.7)  मध्यरात्रीच्या सुमाराला तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळली त्यावेळी एक जण अडकलेला होता त्याला पंचवटी अग्निशमन दल व पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढले.

मखमलाबाद नाका येथे हर्षवर्धन सोसायटी असून सदर इमारत सुमारे 35 ते 40 वर्षांपूर्वीची जुनी असल्याने धोकेदायक झाली होती. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी रात्री पूर्ण इमारतच कोसळली. यावेळी  इमारत धोकादायक झाल्याने इमारतीतील सर्वच सदस्यांनी इमारत खाली केली होती. मात्र सोनू दुसाने हा त्या ठिकाणी राहत होता. ज्यावेळी इमारत कोसळली त्यावेळी सोनू हा यामध्ये अडकला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांना त्याला सुखरुप बाहेर काढले. 

 

Web Title: The building collapsed in Panchavati area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक