विहिरीत पडलेल्या बैलाला तीन तासांच्या प्रयत्नानंतर जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 03:34 PM2019-12-02T15:34:22+5:302019-12-02T15:35:15+5:30
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे २५ फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले.
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे २५ फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले. पिसाळलेल्या बैलाला जेसीबीच्या सहाय्याने ठार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. याउलट सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून जीवदान देत पशुप्रेमाचे अनोखे उदाहरण ठेवले आहे. गहू पेरणीसाठी मित्राकडून आणलेला बैल शेताच्या बांधावर बांधलेला असतांना तोल जाऊन विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर जेसीबीच्या साहाय्याने बैलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले. बाळासाहेब शिंदे या शेतकºयाने पाचपट्टा तालुका अकोले येथील आपल्या मित्राकडून गहू पेरणीच्या कामासाठी बैल आणला होता. दोन बैल बांधावर चरत असतांना त्यातील एक बैल २५ फुट विहीरीत पडला. जवळ कोणीही नसल्याने ही घडना समजण्यास थोडा उशीर झाला. विहीरितून हंबरण्याचा आवाज येत असल्याने बाजूला जात असलेल्या लोकांनी विहीरीत डोकावून बघितले असता बैल पडलेला दिसला. या विहिरीत पाणी नसल्याने बैलाचे प्राण वाचले. परिसरातील शेतकऱ्यांनी जेसीबी आणून पडीत विहिरीतून बैल बाहेर येण्यासाठी जागा तयार करुन बैलाला कोणत्याही प्रकारची इजा न होता जेसीबीच्या साहाय्याने माती बाजूला करुन बैलास सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी मधूकर आव्हाड, किरण बो-हाडे, राहूल डगळे, जयवंत काकड यांच्यासह या शेतकºयांनी बैलाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करुन बैलास सुखरु प बाहेर काढले.