भंगार दुकानांवर लवकरच बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:20 AM2019-11-30T01:20:28+5:302019-11-30T01:22:27+5:30

सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार प्रकरणी अवमान याचिकेची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनदेखील कारवाईसाठी सरसावले आहे. येथील बेकायदा दुकानांवर बुलडोझर चालविण्यासाठी तयारी करतानाच पोलिसांनी बंदोबस्त द्यावा यासाठी आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.

Bulldozer at debris shops soon | भंगार दुकानांवर लवकरच बुलडोझर

भंगार दुकानांवर लवकरच बुलडोझर

Next
ठळक मुद्देप्रशासनाची तयारी : पोलीस बंदोबस्तासाठी आयुक्तांना पत्र

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार प्रकरणी अवमान याचिकेची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासनदेखील कारवाईसाठी सरसावले आहे. येथील बेकायदा दुकानांवर बुलडोझर चालविण्यासाठी तयारी करतानाच पोलिसांनी बंदोबस्त द्यावा यासाठी आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगारबाजार गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. खासगी जागेत परंतु वापरात बदल करून भंगार दुकाने थाटण्यात आले आहेत. सुमारे नऊशेच्या आसपास असलेल्या ही दुकाने हटविण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर महापालिकेत आयुक्तपदी अभिषेक कृष्ण असताना हा बाजार हटविण्यात आला होता. महापालिकेने बेकायदा दुकानातील साहित्य जप्त करून ते नष्ट करावे तसेच संबंधित दुकानदारांना त्या भागात व्यवसाय करू देऊ नये, असे स्पष्टपणे आदेशात नमूद केले आहे. मात्र, महापालिकेच कारवाईनंतर पुन्हा काही महिन्यांनी दुकाने थाटण्यात आली. त्यानंर ही दुकानेदेखील हटविण्याची मागणी झाली आणि त्यानंतर महापालिकेने कारवाई केली असे आत्तापर्यंत तीन वेळा झाले आहे. परंतु त्यानंतर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने भंगार दुकानांची संख्या वाढतच आहे. काही महिन्यांपूर्वी दुकाने हटविण्याची तयारी महापालिकेने केली, परंतु पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊ नये यासाठी बंदोबस्तास नकार दिला. त्यामुळे हा विषय रखडला.

भाजीबाजारांवर कारवाई
भाजी मंडर्इंची अपुरी संख्या किंवा काही अन्य अडचणींमुळे विविध भागात भाजीबाजार रस्त्यावरच भरत असून, त्या पार्श्वभूमीवर लोकमतने वस्तुस्थिती मांडली होती. त्याच दखल घेत आता मंडईतच भाजीविक्री व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झाली आहे. गणेशवाडी येथील भाजीमंडई अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. या मंडईतील ओट्यांचे लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात बेकायदा भरणाऱ्या भाजीबाजारांच्या ठिकाणी महापालिकेने लिलावात सहभागी व्हावे यासाठी फलक लावले आहेत. लिलावापूर्वीदेखील महापालिकेने भाजीविक्रेत्यांवर कारवाई सुरू केली असून त्यामुळे विक्रेते लिलावाला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.

Web Title: Bulldozer at debris shops soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.