बंगल्याच्या आवारातून बुलेटची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:51+5:302021-04-13T04:13:51+5:30

सिद्धार्थ काशीनाथ निकम (रा.वनराज कॉलनी, काठेगल्ली) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निकम यांची बुलेट (एमएच १५, एफएच ...

Bullet theft from bungalow yard | बंगल्याच्या आवारातून बुलेटची चोरी

बंगल्याच्या आवारातून बुलेटची चोरी

Next

सिद्धार्थ काशीनाथ निकम (रा.वनराज कॉलनी, काठेगल्ली) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निकम यांची बुलेट (एमएच १५, एफएच ७१६३) शुक्रवारी (दि.९) रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली.

---

शेजाऱ्यांकडून दाम्पत्यास मारहाण

नाशिक : शिवीगाळ केल्याची कुरापत काढून शेजारी कुटुंबीयांनी दाम्पत्यास बेदम मारहाण केल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील पांडवनगरी येथे घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता वाघ, स्वप्निल वाघ व रमेश वाघ अशी दाम्पत्यास मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी संध्या सीताराम गोसावी (रा.भरत सोसा.पांडवनगरी) यांनी फिर्याद दिली आहे.

---

भाडेकरूचे संसारोपयोगी साहित्य फेकून घरावर कब्जा

नाशिक: गेल्या ५० वर्षांपासून भाडे भरून राहात असताना, परस्पर कुलूप तोडून मायलेकाने कब्जा केल्याची घटना काजीपुरा कोट भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा प्रकाश कोळी व त्यांच्या मुलगा (रा.धोंडगे मास्तर चौक, काजीपुरा कोट) अशी कब्जा करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी देवळाली पोलीस क्वार्टरमध्ये राहणारे महेश किसन सहाणे यांनी तक्रार दाखल केली आहे. सहाणे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून काजीपुरा कोट येथील घर नं. ३४१६ मध्ये वास्तव्यास आहे. न्यायालयाच्या परवानगीने रीतसर भाडे भरून राहात असताना, शनिवारी (दि.१०) रात्री संशयित मायलेकाने सहाणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य बाहेर फेकून देत जबरदस्तीने घराचा कब्जा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Bullet theft from bungalow yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.