सोमवारी सराफा बाजार राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:44+5:302021-08-22T04:17:44+5:30

सराफा संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक बंदला दि नाशिक सराफ असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी ...

The bullion market will remain closed on Monday | सोमवारी सराफा बाजार राहणार बंद

सोमवारी सराफा बाजार राहणार बंद

Next

सराफा संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय लाक्षणिक बंदला दि नाशिक सराफ असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश

नवसे, सेक्रेटरी किशोर वानखेडे, उपाध्यक्ष मेहल थोरात, प्रमोद चोकसी, खजिनदार योगेश दंडगव्हाळ यांनी ही माहिती दिली.

सराफा संघटनांनी पुकारलेल्या बंदबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी नाशिक सराफ असोसिएशनची संघटनेच्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यातील असोसिएशनशी चर्चा करून, २३ ऑगस्ट रोजी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व संघटना एचयूआयडीला विरोध करण्यासाठी कडकडीत बंद पाळणार असल्याच्या निर्णयावर एकमत झाले. त्यामुळे सोमवारी २३ ऑगस्टला दिवसभर नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व सराफा व्यवसाय एकदिवसीय बंद पाळणार आहेत. दरम्यान, सराफा व्यावसायिकांच्या बैठकीत सोन्याच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी (क्वालिटी लिटी कंट्रोल) हॉलमार्कचा कायदा गरजेचा असून, कायद्याचे सर्व सराफा व्यावसायिकांनीही स्वागतही केले आहे. मात्र, केंद्र सरकार एचयूआयडीसारखी क्लिष्ट प्रणाली लादून व्यवसायावर गदा आणू पाहात असल्याचे मत व्यावसायिकांनी बैठकीत मांडले.

या कायद्याने व्यवसाय करणे कठीण होऊन बसले असून, हा कायदा रद्द करण्याची एकमुखी मागणी देशभरातून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांच्या देशव्यापी बंगला पाठिंबा देत, २३ ऑगस्टला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक बंद पाळणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: The bullion market will remain closed on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.