महाविकास आघाडीचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:16+5:302020-12-08T04:12:16+5:30
पंजाब, हरयाणा, राजस्थानातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत, देशभरातील शेतकर्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत अशावेळी ...
पंजाब, हरयाणा, राजस्थानातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर गेल्या आठ-दहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत, देशभरातील शेतकर्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत अशावेळी शेतकर्यांचे हित साधण्यासाठी शांत बसून चालणार नाही, शेतकर्यांनी संघर्षासाठी तयार रहावे, असे आवाहन यावेळी माणिकराव कोकाटे यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. आमदार कोकाटे यांच्याबरोबर संपूर्ण तालुक्यातील जनता संघर्षासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, कॉंग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, बाजार समितीचे माजी उपसभापती सोमनाथ भिसे आदींची यावेळी भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष नामदेवराव कोतवाल, बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, उपसभापती संजय खैरनार, स्टाइसचे चेअरमन पंडितराव लोंढे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्यासह आशाताई गोसावी, गीता वरंदळ, अनिल वराडे, संतोष शिंदे, राजेंद्र चव्हाणके, रामा लोणारे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोरडे, नगरसेवक शीतल कानडी, अलका बोडके, मालती भोळे, वासंती देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. संदीप शेळके, प्रा. राजाराम मुंगसे यांनी सूत्रसंचलन केले.
इन्फो
पुढचा मोर्चा दिल्लीला
आता आपला संघर्षाचा काळ सुरू झाला आहे. सध्याचा मोर्चा हा प्राथमिक मोर्चा असून, पुढच्या मोर्चा दिल्लीला न्यायचा आहे. शेतकर्याला संरक्षण व हमीभाव केंद्राने दिलाच पाहिजे, अशी आग्रही मागणीही कोकाटे यांनी केली. आज वीज मिळत नाही; परंतु इंडिया बुलचा प्रकल्प चालू झाल्यावर परिसरातील वीस किलोमीटर अंतरातील शेतकर्यांना चोवीस तास वीज मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फोटो- ०७ सिन्नर बैलगाडी मोर्चा
सिन्नर येथे शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.
===Photopath===
071220\07nsk_23_07122020_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.