ग्रामीण भागातुन बैलगाडी ऊस वाहतूक नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 03:57 PM2020-12-24T15:57:01+5:302020-12-24T15:58:02+5:30
लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
लखमापूर : आधुनिक युगाचा अनेक क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात प्रभाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पारंपरिक काही गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
सध्याचे युग गतिमान झाल्यामुळें प्रत्येक ठिकाणी कमी वेळेत जास्त काम कसे होईल. यावर जास्त प्रमाणात भर असते. अशाच एका प्रकारात वेळेची बचत करण्यासाठी चालु स्थितीतील साखर कारखान्यांनी वेळेची बचत व ऊस वाहतूक लवकरात लवकर कशी होईल. तसेच कोणत्याही शेतकरी वर्गाचा ऊस शेतात जास्त दिवस उभा राहू नये,यासाठी ट्रक, टँक्कटर आदी वाहनांच्या सहाय्याने ऊस वाहतूक केली जाते.
पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. तेव्हा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर होते. बैलगाडी ऊस वाहतूक साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आत राहायची. त्यासाठी बैलगाडी ऊस ट्रेंडर काढुन ते ऊस वाहतुकीला दिले जात होते.
परंतु आता बाहेरील ऊस पुरवठा क्षेत्र वाढल्याने जास्त किलोमीटर वरुन बैलगाडी वाहतूक करू शकत नाही. म्हणून लांब पल्ल्याची ऊस वाहतूक शेवटी साखर कारखान्यांना आधुनिकरणाकडे वळून यांत्रिकी साधनांचा उपयोग करावा लागला. त्यामुळे बैलगाडी वाहतूकीचे कमी प्रमाण झाले.
आता बाजारपेठेत बैल जोडी खरेदी करण्यासाठी मोठे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. सध्या काही कारखाने बंद असल्याने पुर्वी चे काही बिले बंद पडलेल्या साखर कारखान्याकडे आटकलेल्या असल्याने काही अंशी आता उसतोड कामगार या कामांकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे पुर्वी ज्या साखर कारखान्याकडे उदा. १०० बैलगाडी ऊसवाहतुकीसाठी असायच्या त्या कारखान्याकडे आता ऊस वाहतुकीसाठी फक्त ३० ते ३५ बैलगाडी उपलब्ध आहे. त्याच्या आता ट्रक, ट्रॅक्टर, यांत्रिकी ऊस तोड मशीन यामुळे वेळेची बचत व ऊस लवकर तोडला जातो. व कमी वेळेत कारखाना स्थळांवर लवकर जातो. या गोष्टीमुळे सध्या बैलगाडीवरील ऊसवाहतुक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
१) पुर्वी ग्रामीण भागातून ऊसांची भरलेले बैलगाडी रस्त्याने चालली तर लहान मुले ऊस ओढण्यासाठी एकच गर्दी करायचे व बैलगाडीतून ऊस ओढायचे परंतु आता हे चित्र दिसत नाही.
२) खडतर परिश्रम, रस्त्याची खराबी, बैलगाडी खरेदीसाठी भांडवलाचा तुटवडा, यामुळे या व्यवसायाला काहींनी राम राम ठोकला आहे. (२४ लखमापूर)