बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:11 PM2020-01-16T23:11:38+5:302020-01-17T01:23:26+5:30
देवळा तालुक्यातील पूर्वभागातील डोंगरगाव परिसरात बिबट्याचा वावर असून, रविवारी रात्री सुमारे दोन ते अडीच वाजता अरुण सुकदेव सावंत यांचे शेतातील गोठ्यात बांधलेल्या चार वर्षांच्या बैलावर हल्ला करून बिबट्याने बैलास ठार केले आणि शेजारच्या झुडुपात ओढून नेले. त्याचवेळी इतर जनावरे ओरडू लागल्याने बैलमालक बाहेर आले असता त्यांना बैल मृत्युमुखी पडलेला दिसला.
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्वभागातील डोंगरगाव परिसरात बिबट्याचा वावर असून, रविवारी रात्री सुमारे दोन ते अडीच वाजता अरुण सुकदेव सावंत यांचे शेतातील गोठ्यात बांधलेल्या चार वर्षांच्या बैलावर हल्ला करून बिबट्याने बैलास ठार केले आणि शेजारच्या झुडुपात ओढून नेले. त्याचवेळी इतर जनावरे ओरडू लागल्याने बैलमालक बाहेर आले असता त्यांना बैल मृत्युमुखी पडलेला दिसला. सकाळी त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. यावेळी वनविभागाने विभाग रक्षक ताराचंद देवरे, वनपाल वंदना खरात, वनक्षेत्रपाल अरुण मोरे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून पंचनामा केला. याप्रसंगी सरपंच दयाराम सावंत, स्थानिक वनसमितीचे अध्यक्ष लालजी सावंत, माजी उपसरपंच विनोद सावंत उपस्थित होते. या परिसरात खूप मोठे वनपरिक्षेत्र आहे. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.