गुंडगिरी फोफावतेय : वडाळागावात संशयिताने फायटरने फोडली युवकाची हनुवटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:10 PM2018-10-11T13:10:26+5:302018-10-11T13:12:04+5:30

 Bullying lies: Vadlaga suspected to be falsely beaten by young man | गुंडगिरी फोफावतेय : वडाळागावात संशयिताने फायटरने फोडली युवकाची हनुवटी

गुंडगिरी फोफावतेय : वडाळागावात संशयिताने फायटरने फोडली युवकाची हनुवटी

Next
ठळक मुद्दे पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहारज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते.मोहम्मदची हनुवटी फूटल्याने रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला.

इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार वडाळागावात उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळागाव परिसरातील खंडोबा चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकापासून काही मीटरवर वडाळा पोलीस चौकी आहे; मात्र ही चौकी असून नसल्यासारखी झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.९) येथील एका हॉटेलसमोर फिर्यादी ओवेस व जलाल हे दोघे चहा पिण्यासाठी संध्याकाळी आले होते. यावेळी संशयितांनी ‘तु माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली’ असा प्रश्न उपस्थित करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी बंटी याने रिंगपाणा व शौकतने फायटरचा वापर करत दोघांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मोहम्मदची हनुवटी फूटल्याने रक्तबंबाळ झाला व बेशूध्द होऊन जमिनीवर कोसळला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती त्याचे वडील ओवेस यांना समजताच ते म्हशीच्या गोठ्यावरून तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी अवस्थेत मुलाला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते. या घटनेवरून पुन्हा गुन्हेगारी घटनांनी वडाळागावात डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. संशयित शौकतवर यापुर्वीदेखील गुन्हे दाखल आहे. तसेच बंटी शेख याची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या दोघा सराईत गुन्हेगारांवर यापुर्वी विविध प्रकरचे गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरूध्द गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहार
वडाळा पोलीस चौकी नावालाच उरली आहे. चौकीचे कुलूप अल्पवेळ उघडते. या चौकीत तक्रारींचा निपटारा कमी अन् ‘अर्थ’पूर्ण व्यवहार अधिक होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. वडाळा पोलीस चौकीचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Web Title:  Bullying lies: Vadlaga suspected to be falsely beaten by young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.