बम बम भोले...च्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:26 AM2018-08-28T01:26:57+5:302018-08-28T01:27:45+5:30

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली.

 Bum Bam Bhole ... | बम बम भोले...च्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

बम बम भोले...च्या जयघोषाने दुमदुमली मंदिरे

Next

नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त शहर व परिसरातील महादेव मंदिरे ‘हर हर महादेव...’, ‘बम बम भोले...’च्या जयघोषाने दुमदुमली. प्राचीन सोमेश्वर, कपालेश्वर या प्रमुख मंदिरांसह सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची रेलचेल पहावयास मिळाली. आज तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मनोभावे शिवमंदिरात हजेरी लावून शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन घेतले. गंगापूर शिवारातील जुन्या प्राचीन सोमेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा परिसर उजळून निघाला असून, भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलले होते. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याची आख्यायिका आहे.  श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी वाढल्याने जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची पावले वळल्याने गाभाºयापुढे रांगा लागल्या होत्या. सकाळी मंदिरात महाभिषेक करण्यात आला. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरकुमार मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी विश्वस्त भीमराव पाटील, बापूसाहेब गायकर, राहुल बर्वे, बाळासाहेब लांबे, अविनाश पाटील, देवेंद्र भुतडा आदी उपस्थित होते. शहरातील पंचवटी परिसरातील रामकुंडाजवळ असलेले कपालेश्वर महादेव मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. नंदी नसलेले एकमेव महादेव मंदिर म्हणून कपालेश्वरची ओळख आहे. सोमवारी पहाटे भाविकांसाठी कपालेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. कपालेश्वर मंदिरातील पुजाºयांनी सकाळी पिंडीला रु द्राभिषेक करून महादेवाच्या पिंडीचे विधिवत पूजन व महाआरती केली. सकाळपासूनच शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांची गर्दी लक्षात घेता दक्षिण दरवाजाने प्रवेश व उत्तर दरवाजाने बाहेर जाण्याची व्यवस्था केली होती. मुख्य मंदिराच्या गाभाºयामध्ये विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती.
त्र्यंबकराजाच्या दर्शनाची ओढ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त यात्रा भरली होती. रविवारी संध्याकाळपासून त्र्यंबकराजाच्या दर्शनाची ओढ भाविकांमध्ये दिसून आली. सोमवारी दुपारपर्यंत भाविक बसने प्रवास करत त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी दाखल होत होते.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने ‘त्र्यंबक यात्रा’ कॅच करण्यात आली. सुमारे २७५ जादा बसेसचे नियोजन त्र्यंबक रस्त्यावरील इदगाह मैदानावरून करण्यात आले होते. यावेळी त्र्यंबकराजाच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने जणू मैदानाला बसस्थानकाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुमारे २७५ बसेसद्वारे भाविकांची वाहतूक नाशिक-त्र्यंबक-नाशिक मार्गावरून करण्यात आली.
महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची पालखी
सोमवारी सायंकाळी कपालेश्वर मंदिरातून महादेवाच्या चांदीच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीत महादेवाचा पंचमुखी मुखवटा ठेवण्यात आला होता. कपालेश्वर मंदिरातून पालखी अंबिका चौक, मालवीय चौक, शनि चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिर रस्त्याने काढण्यात येऊन रामकुंड येथे पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर कपालेश्वर मंदिरात महाआरतीने पालखी समारोप करण्यात आला.

Web Title:  Bum Bam Bhole ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.