बिबट्याने हल्ला करून बोकड केले फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 05:50 PM2020-02-06T17:50:50+5:302020-02-06T17:51:33+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे रात्रीच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करून बोकड फस्त केले. येथील भागातील शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतात सिंगल फेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील उद्धव रौंदळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या बोकडावर रात्री बिबट्याने हल्ला करु न तो फस्त केला. सकाळी रौदळ यांना हा प्रकार लक्षात आला बांधलेल्या ठिकाणी रक्त व बिबट्याचे ठसे आढळले.
बोकडा ओढत हत्ती नदीच्या काठावर शेतात फडश्या पाडल्याचे लक्षात आले. त्याची वनविभागला माहिती मिळताच वनरक्षक गौतम पवार, गुलाब ठाकरे घटनास्ळी दाखल झाले व पंचनामा केला.
येथील भागात रात्रीच्या वेळेस अंधार असल्याने रात्री बिबट्या पशुधनाचा फडशा पाडत आहे. शेतांमध्ये सिंगलफेज योजना राबवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. यामुळे पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून दुभतीजनावरे ही मोठ्या प्रमाणात आहेत. पण अचानक बिबट्याच्या वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे. सायंकाळी बिबट्याच्या धाकाने सातच्या आत घरात जावे लागत आहे. तरी वन विभागाने अश्या श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावात व शेतात दररोज रात्री वीज गायब होत असल्याने सकाळी वीज येते. ह्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा रस्त्याने व गांवातही मुक्त संचार वाढला आहे. फोनही विजेअभावी चार्जी गं होत नसल्याने ग्रामस्थामधे संताप व्यक्त केला जात आहे.
परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्र ही जागुन काढावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे सौरक्षण करत आहेत. यावर खबरदारीचे उपाययोजना म्हणून वनविभागाने लक्ष घालवे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरतील शेतकºयांनी केले आहे.
चौकट....
मागील एक ते दिड महिन्यापुर्वी तरसाळी येथे विहिरीत बिबट्या पडला होता. वन विभागाने तो बाहेर काढताच पसार झाला. वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया येथील गावांजवळील कपाळे डोंगर व तरसाळी. मुंजवाड, औंदाणे गावाला लागुन हत्ती नदी आहे. येथे बिबट्याचा तीन-चार वर्षापासुन वावर आहे. पिकांचा आसरा, मुबलक गुरांची संख्या अशी कारणे आहेत.
चौकट -
येथील परिसरात शेतात वास्तव्यास राहणाºया शेतकºयांना वीज वेळेवर मिळत नाही. रात्री वीज गायब होत असल्याने बिबट्या परिसरात व शेतांमध्ये मुक्त फिरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. यामुळे शेतामध्ये सिंगल फेज योजना राबवावी, तसेच वन विभाग व वीज वितरण कंपनीने लक्ष घालावे.
- प्रभाकर रौंदळ, उपसभापती सटाणा बाजार समिती, तरसाळी.