घरफोडीसाठी रिक्षा वापरणारे ‘बंटी-बबली’ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:20 AM2021-09-09T04:20:30+5:302021-09-09T04:20:30+5:30
आयोध्यानगरमधील एका घरात व खंडेराव मंदिरात महिन्याभरापूर्वी चोरी झाली होती. यावेळी घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, चांदीचे दोन मुकूट ...
आयोध्यानगरमधील एका घरात व खंडेराव मंदिरात महिन्याभरापूर्वी चोरी झाली होती. यावेळी घरातून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, चांदीचे दोन मुकूट चोरीस गेले होते. नाशिक रोड पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास केला जात होता. घरफोडीत रिक्षाचा वापर करण्यात आला असून ही रिक्षा त्र्यंबकेश्वर येथे प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन नाशिक रोड पोलिस चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे साध्या वेशात तळ ठोकून होते. रिक्षाचालकांकडे संबंधित रिक्षाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना त्र्यंबकेश्वर येथील टेलिफोन एक्सचेंजजवळ संशयित मनोज जोशी याची ही रिक्षा असून पती-पत्नी घराला कुलूप लावून नाशिकला गेल्याचे समजले. नाशिकला त्यांचा शोध घेत असताना संशयित मनोज संतोष जोशी (२५), लक्ष्मी मनोज जोशी (२२, रात्र्यंबकेश्वर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्र्यंबकेश्वरहून रिक्षातून येऊन घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दागिने, मोबाईल, चांदीचे दोन मुकूट, रिक्षा असा दोन लाख ३४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.