थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:44 PM2020-02-12T22:44:00+5:302020-02-12T23:51:17+5:30

लोहोणेर येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

The burden of action on the outstanding | थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्देलोहोणेर : नळजोडण्या तोडण्याचा इशारा; नावे डिजिटल बोर्डवर झळकविणार




लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
थकबाकीदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने लोकन्यायालयामार्फत पाच ते सहा वेळा घरपोच नोटिसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी थकबाकी अद्याप भरलेली नाही अशा थकबाकीदारांनी येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी न भरल्यास १८ फेब्रुवारीपासून संबंधितांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या खंडित करण्यात येणार असल्याचे सरपंच जयवंता बच्छाव व ग्रामविकास अधिकारी यू. बी. खैरनार यांनी म्हटले आहे.
याबाबत ग्रामपंचायतीने दिलेली माहिती अशी की, लोहोणेर ग्रामपंचायतीची ३१ मार्च २०१९ अखेर सुमारे १३ लाख ७५ हजार ८५८ रु पये घरपट्टी व पाच लाख ५३ हजार ६१२ रुपये पाणीपट्टी थकबाकी आहे. सदरची घरपट्टी थकबाकी ही २०७ जणांकडे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून थकीत आहे, तर १७७ खातेदारांकडे एक वर्षाची थकीत बाकी येणे आहे. या थकीत येणे बाकी वसुलीसंदर्भात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चा होऊन वसुलीबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असा ठराव अर्जुन लाला शेवाळे यांनी सूचक म्हणून मांडला. त्यास माजी सरपंच अशोक अलई यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायतीमार्फत होणाऱ्या लिलावात सहभागी झालेल्या लिलावधारकाकडे ३१ मार्च २०१९ पर्यंत सुमारे १३ लाख ९३ हजार ६०० रुपये थकबाकी आहे. या थकबाकीसंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे गावात आवाहन करण्यात येणार आहे. सदर थकबाकी ग्रामपंचायतीकडे जमा न केल्यास थकबाकीदारांची नावे डिजिटल बोर्डावर झळकाविण्यात येणार आहेत. ज्या थकबाकीदाराकडे ग्रामपंचायतीची घरपट्टी, नळपट्टी अथवा जागाभाडे थकीत आहे अशा थकबाकीदारांनी येत्या १७ तारखेच्या आत आपली थकबाकी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरून द्यावी अन्यथा अशा थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, याबाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन सरपंचांसह प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वसाकाकडे १५ लाखांची बाकी
लोहोणेर ग्रामपंचायतीच्या थकबाकीदारांमध्ये वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, वसाकाकडे १५ लाख १९ हजार २४८ रु पये मागील थकबाकी व ११ लाख ६१ हजार ३१३ रु पये चालू थकबाकी अशी एकूण २६ लाख ८० हजार ५६१ रु पये सन २०१९-२० पर्यंत थकीत रक्कम आहे, तर ग्रामपंचायतीचे ७६ हजार ७७० रु पये जागा भाडेही संबंधितांकडे थकीत आहे.

Web Title: The burden of action on the outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.