उद्यानांचे ओझे आरोग्य विभागावर

By admin | Published: September 30, 2015 10:45 PM2015-09-30T22:45:07+5:302015-09-30T22:46:14+5:30

कचरा संकलन : मनपा आरोग्य विभाग मेटाकुटीला

The burden of gardens on the health department | उद्यानांचे ओझे आरोग्य विभागावर

उद्यानांचे ओझे आरोग्य विभागावर

Next

नाशिक : शहरातील उद्यानांमध्ये होणारा पालापाचोळा, झाडांच्या फांद्या यांसह अन्य निर्माण होणारा कचरा संकलनाचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाऐवजी आरोग्य विभागाने करण्याचा फतवा प्रशासनाने काढल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे सदर कामाची पूर्तता करताना आरोग्य विभाग अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. उद्यान विरुद्ध आरोग्य विभागामध्ये संघर्ष पेटला असताना त्याचा परिणाम उद्यानातील देखभालीवर होत आहे.
महापालिकेत स्वतंत्र उद्यान विभाग कार्यरत असून, या विभागामार्फत शहरातील ४७० उद्यानांचे नियंत्रण व देखभाल-दुरुस्ती केली जाते. परंतु प्रशासनाने उद्यान विभागातील कामांचे विकेंद्रीकरण करतानाच उद्यान विभागात रोज साचणारा झाडांचा पालापाचोळा, फांद्या तसेच अन्य कचरा संकलनाची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली आहे. त्यामुळे सदर कामांची पूर्तता करताना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. प्रभागांमध्ये साफसफाईची कामे करण्यासाठी अगोदरच मनुष्यबळ अपुरे असताना आरोग्य विभागाला उद्यानातील कचरा संकलनासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देताना कसरत करावी लागत आहे. उद्यान विभागही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम आमचे नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत आहे. आरोग्य आणि उद्यान विभागाच्या या संघर्षाचा परिणाम उद्यानांच्या देखभालीवर होत असून, अनेक उद्यानांमध्ये सद्यस्थितीत गाजरगवत व कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: The burden of gardens on the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.