ग्रामीण महिलांचे डोक्यावरचे ओझे हातावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 01:36 PM2020-07-07T13:36:59+5:302020-07-07T13:37:23+5:30
पेठ : तालुक्यात बहुतांश गावांना सार्वजनिक विहीर किंवा हातपंपाव्दारे पाणीपुरवठा केला जात असल्याने महिलांना डोक्यावर दोन -तीन हंडे घेऊन पाणी वाहत रहावे लागत असल्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक युवकांच्या प्रयत्नांनी वनवासी कल्याण आश्रमच्यावतीने पेठ तालुक्यातील १३ गावांना १०० वॉटर व्हीलचे वाटप करण्यात आले.

पेठ तालुक्यात बहुतेक गावांना गावाबाहेर सार्वजनिक विहीरी किंवा कुपनलिका आहेत. अशा वेळी महिलांना डोक्यावर तीन तीन हंडे घेऊन पाणी आणावे लागते. करंजखेड येथील कमलेश वाघमारे व परिसरात सामाजिक कार्य करणार्या युवकांनी वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेंढपाडा, वखारपाडा, आमडोंगरा, म्हसगण, उखळीमाळ, आंबे, सावरीचापाडा, मोहदांड, डिक्सळ, तोरणमाळ, करंजखेड, पाहुचीबारी, दाभाडी आदी गावातील गरजू व दिव्यांग नागरिकांना वॉटर व्हील वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मुरली चौधरी, मनोहर जाधव, दिलीप महाले,कल्पेश वाघमारे, भरत जाधव, रघुनाथ घोरपडे, प्रविण जाधव. रोहिदास राऊत, मधुकर गवे,धनाजी लहरे,लहूदास गवे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------
आदिवासी भागात वृद्ध व दिव्यांग नागरिकांना विहीरीवरून पाणी आणने सुलभ जावे यासाठी वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून वॉटर व्हील चे वाटप केल्याने महिलांचा त्रास काही अंशी कमी होईल. भविष्यात पाणी टंचाई निवारणासाठी काम हाती घेण्यात येणार आहे.
- कमलेश वाघमारे, करंजखेड, ता. पेठ