प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:23+5:302021-03-14T04:14:23+5:30
नाशिक जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी कमीत कमी दोन एमबीबीएस पात्रता वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली ...
नाशिक जिल्ह्यात ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी कमीत कमी दोन एमबीबीएस पात्रता वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणे अपेक्षित असून, आरोग्य उपकेंद्रांची जबाबदारी तदर्थ म्हणजेच बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असावी असा नियम आहे. परंतु शासन पातळीवरच एमबीबीएस पात्रतेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून भरती केली जात नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, त्यामुळे ग्रामीण आरोग्याचा विचार करून स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन करून गरज भागवून घेतली जात आहे.
------
११२- जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र
१९३ एमबीबीएस डॉक्टरांची पदे
३०- रिक्तपदांची संख्या
-----------------
कमी वेतनामुळे एमबीबीएस डॉक्टरांचा नकार
शासनाकडून एमबीबीएस डॉक्टरांना दिले जाणारे वेतन कमी असल्याने तसेच ग्रामीण व अतिदुर्गम भागात नेमणूक दिली जात असल्यामुळे एमबीबीएस डॉक्टर शासनाच्या आरोग्य सेवेत दाखल होण्यास नकार देत आहेत. शासकीय नोकरीपेक्षा स्वत:चा दवाखाना थाटल्यास त्यातून कमाई करण्याकडे कल असल्यामुळे शासकीय सेवेकडे त्यांचा ओढा कमी आहे.
---------------
शासनाकडून एमबीबीएस डॉक्टरांची पदे भरण्यासाठी प्रक्रिया केली जाते. परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही पदे रिक्त राहतात. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करावी लागते.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
----------
बागलाण- ११-२२-२
चांदवड- ५-१०-०
देवळा- ५-१०-०
दिंडोरी- १०-२२-१
इगतपुरी- ८-१८-४
कळवण-९-१८-२
मालेगाव- ९-१८-२
नांदगाव- ५-१०-४
नाशिक- ५-१०-०
येवला- ६-१२-१
त्र्यंबक- ७-१६-१
पेठ- ७-१६-६
सिन्नर- ७-१४-१
सुरगाणा- ८-१६-४
निफाड- १०-२२-२