गरिबांचा बर्गर महाग झाला; वडापाव आता २०रुपयांना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:37+5:302021-08-29T04:17:37+5:30
चौकट- म्हणून महागला वडापाव बटाटावडा तयार करण्यासाठी लागणारे बेसन, बटाटे, मसाला, तेल या सर्वच वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ ...
चौकट-
म्हणून महागला वडापाव
बटाटावडा तयार करण्यासाठी लागणारे बेसन, बटाटे, मसाला, तेल या सर्वच वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागड्या दराने कच्चा माल घेऊन आहे त्याच दरात वडापाव विकणे विक्रेत्यांना शक्य नसल्याने त्यांना दरवाढ करणे क्रमप्राप्त ठरले. याशिवाय बेकरी उत्पादकांनी पावाचे दरही वाढविले आहेत. यामुळे सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत.
चौकट-
वडापावशिवाय दिवस जाणे कठीण
कोट-
मला सकाळी लवकर घराबाहेर पडावे लागते. त्या वेळापर्यंत घरी स्वयंपाक तयार होत नाही. यामुळे चालता चालता दोन वडापाव खाऊन घेतले तरी सकाळचा नास्ता पूर्ण होतो. किंबहुना गेल्या काही वर्षांपासून ती माझी सवय झाली आहे; पण आता दर वाढ झाल्यामुळे ते परवडणारे नाही असे दिसते. - राजेंद्र गरूड,
कोट-
वडापाव हे तसे आमचे बालपणापासूनचे आवडते खाद्य. पुढे नोकरीनिमित्त घरापासून दूर रहावे लागले तेव्हा तर वडापावचा मोठा आधार होता. तुटपुंज्या पगारात सर्व गरज भागविताना स्वस्तात मिळणारा चविष्ट वडापाव कधी कधी आमची भूक भावायचा. त्यावेळी एकाचवेळी तीन -चार वडापाव खाल्ले तरी फारसे बिल होत नव्हते. आता ते शक्य होईल असे वाटत नाही - नरेंद्र ठेंगे,
चौकट-
कोरोनाचा मोठा फटका
कोट-
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झाले आणि पूर्ण व्यवसायाचीच वाट लागल्यासारखे झाले. इतरवेळी आमच्या दुकानात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असायची; पण गेल्या दीड वर्षापासून ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. याशिवाय कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे आहे त्या किमतीत वडापाव विकणे परवडणारे नाही - रवींद्र दुरगुडे, विक्रेता
कोट-
तेलासह डाळीच्या पिठाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वड्याचा आकार कमी केला तर ग्राहक नाराज होतात यामुळे वडापावचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉकडाऊनच्या काळात ग्राहक वडापाव खायला घाबरायचे त्यामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आता हळूहळू व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. - विवेक जोशी, विक्रेता