ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

By admin | Published: November 5, 2016 12:05 AM2016-11-05T00:05:24+5:302016-11-05T00:05:24+5:30

ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

Burglary; Lumpus worth Rs 90 thousand | ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

ठेंगोड्यात घरफोडी; ९० हजारांचा ऐवज लंपास

Next

ठेंगोडा : येथील ग्रामपंचायत सदस्य मधुकर व्यवहारे बाहेरगावी गेल्याची संधी साधत बाजारपेठेतील भरचौकात रात्री घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी दहा हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याच्या पाच अंगठ्या, लक्ष्मीची मूर्ती, चांदीची भांडे आदिंसह ९० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरात भुरट्या चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे.
दरम्यान, व्यवहारे बाहेरगावाहून उशिरा घरी पोहोचल्यावर त्यांना घरातील अस्ताव्यस्त सामान बघितल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती सटाणा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  घटनास्थळावरील वस्तूंची ठसे तज्ज्ञांकडून तपासणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सटाणा पोलीस  स्टेशनचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जाधव अधिक तपास करीत
आहेत. (वार्ताहर)
इसमाच्या मृत्यूप्रकरणी अहवाल पाठविणार
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील आवळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू झालेल्या घटनेबाबत जबाबदारी झटकणाऱ्या वनविभाग मात्र खडबडून जागा झाला आहे. वनविभाग व पोलिसांच्या पथकांनी गुरुवारी घटना स्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करत अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. तसेच मृत इसमाच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.  इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने तसेच हा बिबट्या काही दिवसांपूर्वी एका आश्रमशाळेत शिरल्याने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने अनेकदा केली होती. मात्र वनविभागाने या मागणीला गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर या बिबट्याच्या हल्ल्यात आवळी येथील पंढरी किसन वाघ हा इसमाचा जंगलात मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. दरम्यान, याही प्रकाराचा वन विभागाने इन्कार करीत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. तत्काळ वनपाल सोनवणे, वन रक्षक निकम, पोलीस हवालदार जगताप आदिंच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी आणि पंचनामा केला. यावेळी श्रमजीवी कार्यकर्ते रामचंद्र मुकणे, संतू ठोंबरे आदि उपस्थित होते. सदरील अहवाल वरिष्ठांकडे पाठवून मृताच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती वनविभागाच्या पथकाने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. (वार्ताहर)

Web Title: Burglary; Lumpus worth Rs 90 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.